Eknath Shinde Opration Tiger: ऑपरेशन टायगर (Opration Tiger) अंतर्गत राबवणाऱ्या ॲापरेशन तुतारीला भाजप हायकमांडने ब्रेक लावल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ॲापरेशन तुतारी राबवण्यास भाजपकडून रेड सिग्नल देण्यात आला. तुतारी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदारांना एनडीएमध्ये यायचं असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडून यावं, असा सल्ला भाजप हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दिला.
ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला? (Eknath Shinde Opration Tiger)
तुतारीचे 6 खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याची एकनाथ शिंदेची तयारी होती. सध्या शिवसेना शिंदेंकडे 7 खासदार आहेत. जर शरद पवार गटाचे 6 आणि ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आल्यास एकूण 19 खासदार शिवसेना शिंदे गटाचे होतील. त्यामुळे 19 खासदारांचा संख्याबळावर राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवणं.
तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर एकनाथ शिंदे दावा करणार असल्याची रणनीती होती. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या या रणनीतीला अद्याप ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीय. मागील दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना भेट दिली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात?, यामागचं कारण जाणून घ्या… (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)
पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…
खासदारांना प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…
केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा
पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण ठरलाय. प्रमुख कारण म्हणजे
एकनाथ शिंदे
ंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं.
केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत.