आता लायसन्ससाठी जादा पैसे मोजावे लागणार… नवीन दर पहा Driving Licence New Charges

Driving Licence New Charges:परिवहन विभागाकडून टपाल (पोस्ट) विभागामार्फत परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) घरपोच मिळण्यासाठी आता सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

त्यानुसार परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी ५८ रुपयांऐवजी ७० रुपये द्यावे लागणार आहेत. एक जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने नागरिकांच्या खिशाला आता झळ बसणार आहे.

राज्याच्या परिवहन विभागामार्फत वाहन चालकाने चाचणी दिल्यानंतर तसेच नवीन वाहन घेतल्यानंतर परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र संबंधित व्यक्तींना घरपोच पाठविण्यात येते.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यासाठी परिवहन विभागाने टपाल विभागाबरोबर सामंजस्य करार केला आहे. दरवर्षी या कराराचे नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार टपाल विभागाकडून या सेवेसाठी १८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो.

त्यामुळे परिवहन विभागाकडून या सेवेसाठी नागरिकांकडून प्रत्येकी ५८ रुपये आकारले जात होते. टपाल विभागाने स्थानिक (जिल्ह्यातील) आणि गैरस्थानिक (जिल्ह्याबाहेरील) असे दोन दर आकारणीबाबत परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.

या प्रस्तावाला परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. याबाबत परिवहन विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता नागरिकांंना परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येकी ५८ रुपयांऐवजी ७० रुपये मोजावे लागणार आहेत.

असा मध्यम मार्ग

टपाल विभागाकडून स्थानिक पत्त्यावर जिल्ह्यांतर्गत सेवा देण्यासाठी ४४.६५ रुपये सेवाशुल्क आकारले जात होते. तसेच जिल्ह्याबाहेर (गैरस्थानिक) पत्त्यासाठी ८०.९९ रुपये असे दोन दर सूचवले होते.

मात्र, ‘वाहन’ आणि ‘सारथी’ या ऑनलाईन प्रणालीमध्ये दोन वेगळे दर आकारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने परिवहन विभागाने परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी प्रत्येकी ७० रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे

असे शुल्क मोजावे लागणार

परिवहन विभागाच्या घरपोच सेवेसाठी दरवाढ केल्यामुळे पक्क्या परवान्यासाठी ७७० रुपये (जुने दरानुसार ७५८), नुतनीकरण केलेल्या परवान्यासाठी ४७०(जुन्या दरानुसार ४५८) रुपये आणि दुचाकी चारचाकी एकत्र परवान्यासाठी १,०७० रुपये मोजावे लागणार असून एक ऑक्टोबर २०२५ पासून ज्या नागरिकांनी वाहने घेतली आहेत, पक्के परवाने किंवा नुतनीकरण केले आहे, त्यानुसार एक जानेवारीपासून वाढीव शुल्कानुसार आकारणी करावी असे निर्देश दिले आहेत.

सेवेचा आढावा

– पूर्वीचे टपाल शुल्क – ५८ रुपये जीएसटीसह

– नवीन टपाल शुल्क – ७० रुपये जीएसटीसह

– एकूण वाढ – प्रती सेवा १२ रुपयांची

परिवहन विभागाच्या निर्देशानुसार नागरिकांना घरपोच देण्यात येणाऱ्या सेवांच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. – स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment