वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात ग्रंथपाल, वाहनचालक, औषध निर्माता व इतर 1107 पदांची भरती | Department of Medical Education and Research Recruitment 2025

Department of Medical Education and Research Recruitment 2025:वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे.

DMER (Directorate of Medical Education and Research), मुंबई अंतर्गत विविध गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील 1107 पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

बांधकाम कामगार योजना आता या १० वस्तू मिळणार, भांडी वाटप! नवीन शासन निर्णय निर्गमित | Bandhkam Kamgar Yojana

ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया

DMER Bharti 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जून 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांनी स्पर्धा परीक्षा-2025 या टॅबखाली जाऊन अधिकृत संकेतस्थळावरून https://www.med-edu.in/ अर्ज भरावा.

 

सविस्तर जाहिरात येथे पहा

अर्ज कसा करावा?

अर्ज भरताना उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावेत.

तसेच परीक्षा शुल्कही ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल.

इतर कोणत्याही माध्यमातून दिलेले अर्ज वा शुल्क अवैध ठरवले जाईल.

अधिकृत संकेतस्थळाची भूमिका

भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक, सूचना, वेळेत होणारे बदल इत्यादी https://www.med-edu.in/ या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित केले जातील. कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांशी केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळाची नियमितपणे पाहणी करत राहणे आवश्यक आहे.

जाहिरात बाबत विशेष सूचना

सदर भरतीबाबत कुठल्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावर दिलेली जाहिरात यामध्ये विसंगती आढळल्यास, संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरातच अंतिम आणि अधिकृत समजण्यात येईल.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट: https://www.med-edu.in/

जाहिरात व ऑनलाईन अर्ज: 19 जून 2025 पासून उपलब्ध

टिप: ही भरती प्रक्रिया पारदर्शक व सरळसेवा कोट्यातील आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा.

कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! जुलैमध्ये महागाई भत्ता (DA) 57% होणार, नवीन आकडेवारी जारी DA Hike Update 2025

Leave a Comment