सरकारी कर्मचारी/ पेन्शन धारकांना सातव्या वेतन आयोगाची शेवटची 4% महागाई भत्ता वाढ! DA Hike News

DA Hike News:केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या जरी 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा सुरू असली, तरी त्याआधीच केंद्र सरकार जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात (DA) 3 ते 4 टक्क्यांची वाढ करू शकते. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) हा सरकारकडून दिला जाणारा एक आर्थिक दिलासा असतो, जो महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो.

आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट 8th Pay Commission

DA मध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते – एकदा जानेवारीमध्ये आणि दुसरी वेळ जुलैमध्ये. सरकार वाढीची घोषणा कधीही करु शकते, पण ती लागू मात्र 1 जानेवारी किंवा 1 जुलैपासूनच मानली जाते. जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या DA वाढीची घोषणा सरकार दिवाळीपूर्वी करू शकते.

पगारावर काय परिणाम होणार?

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18,000 रुपये आहे, तर सध्या त्याला 53% DA म्हणजेच 9,990 रुपये मिळत आहेत. जर DA मध्ये 3% वाढ झाली, तर तो 10,440 रुपये होईल – म्हणजेच दरमहा 540 रुपयांची वाढ. ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अधिक आहे, त्यांना या वाढीचा आणखी जास्त लाभ मिळणार आहे.

घरकुल योजनेची यादी आली, लगेच आपलं नाव चेक करा, मोबाईल मधून pdf डाउनलोड करा pm awas yojana maharashtra list 2025

निवृत्त कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळेल?

निवृत्त कर्मचाऱ्यांना DA ऐवजी DR (Dearness Relief) दिले जाते. मात्र, DA वाढला की DR देखील तितक्याच टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा थेट लाभ मिळणार आहे.

सरकार घोषणा कधी करणार?

जून 2025 महिन्याचा CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) डेटा जुलैच्या अखेरीस जाहीर होईल. त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात DA वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानंतर वाढीव DA मागील जुलै 2025 पासून लागू करून एरियरसह दिला जाईल.

8वा वेतन आयोग लागू होईपर्यंत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणारी ही DA वाढच एक दिलासा देणारा मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा पेंशनर असाल, तर जुलै 2025 मध्ये मिळणारी ही 3-4% DA वाढ तुमच्या खिशाला थोडा दिलासा देणारी ठरणार आहे.

अधिक व महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment