Crop Insurance 2025:राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ३२५८ कोटी ५६ लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत पूरग्रस्तांना साडेसात हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी १,३५६ कोटीची मदत कालच वितरित करण्यात आली.
ई-केवायसीत हलगर्जी केल्यास मदतीला मुकणार
एप्रिल व मे महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने शेतीला मोठा तडाखा दिला होता. त्यामुळे उन्हाळी तसेच फळपिकांची मोठी हानी झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने एप्रिल व मे महिन्याची एकत्रित भरपाई मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-केवायसी करण्याचे बंधन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या माहितीत त्रुटी असल्याने त्यांना अजून पात्र ठरविण्यात आलेले नाही. मात्र केवायसी करण्यात शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात केवायसीअभावी रखडला मदतनिधी
पुणे जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य सरकारने मंजूर केलेले अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी केवायसी घेतली नसल्याने त्यांना मदत जमा करण्यात अडथळे येत आहेत.
पुणे जिल्ह्यात ४७ हजार ४२४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ४० हजार ९८६ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातील तब्बल ३० हजार ८९ लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी न केल्याने त्यांना ही मदत वाटप करता आलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी राज्य सरकारने २६ कोटी ९२ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.
विभागनिहाय मिळालेला निधी (कोटीमध्ये)
विभाग शेतकरी क्षेत्र निधी
नागपूर ३,७६,९६८ ३,४४,६२९.३४ ३४०,९०,८०००अमरावती ४,७८,९०९ ५,२६,३८१.३६ ४६३, ८,३००००पुणे ८,२५,१८९ ७,०९२०९.१५ ९५१, ६३,३७०००नाशिक १५, ७९,२३९ ११,५०,३०१.७६ १४७४,८४,९००० कोकण १,०५,२३९ २९,२३३.१६ २८,१०,६३०००
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा