कॅफेत अत्याचार करून गर्भपात प्रशिक्षणार्थी फौज दारावर गुन्हा दोघेही परभणीचे : २५ वर्षीय युवतीची वर्षभरानंतर पोलिसांकडे धाव Crime News 2025

Crime News 2025:स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना प्रेमसंबंधातून मैत्रिणीवर कॅफेत अत्याचार करून नंतर गर्भपात करणाऱ्या प्रशिक्षणार्थी फौजदारावर बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. परभणी) असे आरोपीचे नाव असून तो नाशिक अकादमीत पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्यासह मैत्रिणीला धमकावल्याने त्याची बहीण व वडिलांवरही आरोप केल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोठी बातमी ! महापालिका निवडणुका रखडणार? सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड.Maharashtra Panchayat Raj Election Update 2025

२५ वर्षीय तरुणी व भागवत काही महिन्यांपूर्वी शहरात सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

२४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे क्रांती चौकातील कॅफेमध्ये संबंध प्रस्थापित झाल्याने तरुणी गर्भवती राहिली, ही बाब कळताच त्याने जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत त्यांचे खासगी छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यानंतर भागवत पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाला.

 

तरुणीच्या आरोपानुसार, भागवतने तिला ब्लॉक केले. तिने हा प्रकार त्याची बहीण व वडिलांना सांगितला. मात्र, त्यांनीदेखील ‘तुला जे करायचे ते कर’ असे म्हणून धमकावले. संतप्त तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. भागवतवर बलात्कार, अॅट्रॉसिटीचा गुन्हा क्रांती चौक ठाण्यात नोंदवला.

कॅफेमध्ये चालतेय काय :

काही महिन्यांपूर्वी शहरात कॅफेमध्ये बलात्काराचे जवळपास तीन गुन्हे दार झाले. त्याशिवाय, नशेखोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले.

ही बाब लक्षात घेत शहर पोलिस व मनपाने संयुक्तरीत्या कॅफेंवर कारवाई केली. मात्र, अद्यापही शहरात अनेक ठिकाणी अवैध, विनापरवाना कॅफे उघडले असून तेथे गैरप्रकारासाठी जाग उपलब्ध करून दिली जात आहे.

घटना स्थळांचा पंचनामा

सोमवारी सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भागवतवा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment