Couple Dance Viral Video: सोशल मीडियामुळे पती-पत्नीमधील भांडणं, प्रेम, मजामस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळ पती-पत्नीचे गुण नाही जुळले तरी चालेल पण त्यांची आवड-निवड जुळायला हवी. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते.
परंतु आजकाल काही लोक या कलेचा अपमान करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काही जण मुद्दाम अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. पण आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील डान्स पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.
सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. आता अशाच एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय, ज्यात ती तिच्या पतीबरोबर नाचताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एका पती-पत्नीची जोडी एका हिंदी गाण्यावर डान्स करायला सुरूवात करते. यावेळी ते दोघे एकापेक्षा एक रोमाँटिक डान्स स्टेप्स करतात. त्यांचा डान्स पाहून आसपास जमलेले लोक त्यांच्याकडे खूप आश्चर्याने आणि कौतुकानेही पाहतात.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @samiranbarui96 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या असून यावर यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “काय नाचले राव दोघे“, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “काकू जरा हळू नाचा… ”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “बापरे, हा कसला रोमाँटिक डान्स”