Cotton Soybean MSP 2024-25 नमस्कार शेतकरी बांधवांनो निवडणुकीच्या तोंडावर सरकार शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी कापूस सोयाबीन आणि कांदा या मुख्य नगदी पिकाच्या हमीभावात सरकारने वाढ केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता केंद्र शासनाने 2024 25 या आर्थिक वर्षासाठी कापूस सोयाबीन या नगदी पिकाच्या हमीभावात वाढ जाहीर केली आहे.
केंद्र शासनाचा हा निर्णय शेतकरी बांधवांना दिलासा देणार असून बऱ्याच शेतकरी बांधवांनी भाव वाढ होण्याच्या अपेक्षान कापूस आणि सोयाबीन साठवून ठेवले आहे अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी 2024- 25 वर्षासाठी कापूस 7521 व सोयाबीन रुपये 4892 प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.
हमीभावातील वाढीमुळे शेतकऱ्यांना काय होणार फायदा.?
कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचे मुख्य पीक आहे या पिकावर शेतकरी बांधवांच्या संसाराचा गाडा चालतो. कापूस आणि सोयाबीनला योग्य बाजार मूल्य मिळाले तर शेतकऱ्याच्या पदरात काही ना काही उरते उत्पादन खर्च आणि महागाई पाहता शासन कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात चांगल्या प्रकारे वाढ करत नाही. एक तर शेतकऱ्यांचे पीक चांगले आले तर दुसरीकडे बाजारात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दरवर्षी निराशा पदरी पडते. त्यामुळे केंद्र शासनाने निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांच्या हमीभावात प्रति क्विंटल 501 रुपयांची वाढ केली आहे. Cotton Soybean MSP 2024-25
कापसचा 2024- 25 वर्षासाठी हमीभाव किती आहे?
महाराष्ट्र राज्याची कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीन या शेतकऱ्यांच्या मुख्य पिकाला चांगला हमीभाव देण्याची केंद्र शासनाकडे विनंती केली होती. कापसाला कमीत कमी 7800 रुपये तर सोयाबीन पिकाला 5100 रुपये एवढा हमीद भाव द्यावा अशी विनंती केंद्र शासनाकडे कृषीमंत्र्यांनी केली होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी वर्ग त्यांच्या पिकाला नसलेल्या भावामुळे भाजप पक्षावर नाराज असल्याचा फटका भाजप खासदारांना बसला या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे.
Cotton Soybean MSP 2024-25 : सोयाबीन
गेल्या वर्षीच्या हमीभाव: 4600 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 4892 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा हमीभावात 292 रुपये एवढी वाढ केली आहे.
Cotton Soybean MSP 2024-25 : कापूस
गेल्या वर्षीचा हमीभाव: 6620 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 7121 रुपये मध्यम धाग्याच्या कापसासाठी तर लांब धाग्याच्या कापसासाठी 7521 रुपये आहे.
गेल्या वर्षीच्या तुलने यावर्षी शासनाने 501 रुपयांच्या वाढ केली आहे.
तसे पाहता शासनाने केलेल्या हमीभावातील वाढ ही कवडीमोल आहे मागायचा दर आणि खतांच्या किमती बियाणांच्या किमती या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दरवर्षी खतांच्या आणि बिया बियाण्याच्या किमतीत हजार रुपये वाढ होते आणि हमीभावात फक्त 200 आणि 300 रुपये वाढ होते.
Gold Price today सोन्याच्या भावात आज सकाळी पुन्हा वाढ पहा. आजचे ताजे भाव
या शासनाने नवीन जाहीर केलेल्या हमीभावावर शेतकरी बांधव किती खुश होतील आणि नाराज होतील याचे चित्र लवकरच आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.
कापूस आणि सोयाबीन कधी विकावा आता शेतकऱ्यांपुढे नवा प्रश्न ?
सोयाबीनची सध्याची बाजारातील दर पाहता सोयाबीनला सरासरी बाजारामध्ये यावर्षी 5540 रुपये एवढा हायेस्ट दर मिळाला. सध्या ठोक बाजारात सोयाबीन साडेचार हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत कॉलिटी पाहून विकले जात आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीनची कॉलिटी आणि साठवण नुकीचा कालावधी पाहता. 5500 रुपये पर्यंत भावात तज्ञांच्या मते विकणे चांगले राहील. सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढण्याची अपेक्षा होती मात्र याचा परिणाम बाजारावर फारसा दिसून आला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्त वाट न पाहता आपल्या विवेक बुद्धीचा विचार करून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाल्यास सोयाबीन विकणे कधीही चांगले राहील. Cotton Soybean MSP 2024-25
कापूस बाजारभावातील बदल :- महाराष्ट्रात सध्या कापसाला सरासरी सात हजार दोनशे रुपये पर्यंतचा दर मिळाल्याचे आपल्याला दिसत आहे.
यावर्षी कापूस जास्तीत जास्त 7500 पर्यंत जाऊ शकतो असे बाजारातील तज्ञांचा अंदाज आहे. यावर्षी बऱ्याच भागात परतीच्या पावसामुळे कापूस पीक भिजला आहे तरी शेतकरी बांधवांनी जास्त विलंबन करता आपल्या कापसाची कॉलिटी पाहून कापूस 7500 सात हजार पाचशे रुपये पर्यंत विकणे फायदेशीर ठरेल.
शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा दर 5500 पाच हजार पाचशे ते 5800 पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करावी.
तसेच कापसाच्या बाबतीतही आहे कापसाचा दर 8000 पासून 7500 पर्यंत मिळाल्यास टप्प्याटप्प्याने विक्री करावी जर कापूस ओला असेल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली असू शकते.
टीप:- वरील माहिती आम्ही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी देत आहेत कापसाची आणि सोयाबीनची खरेदी विक्री शेतकरी बांधवांनी आपल्या जोखमीवर आणि विवेक बुद्धीचा विचार करून करावा.