Cotton Rate Today संभाजीनगर:- दिनांक 22 नोव्हेंबर 2024. कापसाचे भाव वाढतील का 2024? महाराष्ट्रात कापूस दर किती आहे? लाईव्ह कापूस भाव.
यावर्षी निसर्गात साथ शेतकऱ्याचे पीक जोमात आलं. कापसाचे पीक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे मुख्य पीक असल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. कापसाचं मुख्य पीक शेतकरी बांधवांच्या आर्थिक संसाराचा कणा आहे परंतु यावर्षी निसर्गाने साथ दिली मात्र बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडं मोडलं गेलं. चला तर आपण पाहूया यावर्षी कापसाच्या पिकात वाढ होईल की घट याची सविस्तर माहिती आपण बाजार तज्ञांच्या अंदाजानुसार पाहूया.
कापसाचे भाव वाढणार या अशाने शेतकरी बांधवाने कापसाचे साठवणूक करून ठेवला आहे, परंतु डिसेंबर यायला सुरुवात झाली तरी पण कापसाच्या भावात समाधानकारक अशी वाढ होताना आपल्याला दिसत नाही.
दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढतील असे अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र गेल्या काही दिवसापासून तसे झाले नाही का दराबाबत समाधानकारक गोष्ट बाजारात दिसत नाही. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर कापसाचे भाव वाढतील एवढीच आशा आता शेतकरी बांधवांना आहे. पण प्रत्यक्ष मात्र बाजारात सध्या 6700 ते 7000 रुपयांपर्यंत बाजार भाव आपल्याला मिळताना दिसत आहे.
सरकारने हमीभाव जाहीर केला मात्र बाजारात व्यापारी हमीभावाने देखील कापसाची खरेदी करत नाहीत आणि अधिकृत सरकारी पणन केंद्रावर देखील कापूस घ्यायला अजून सुरुवात केलेली नाही.
भविष्यात कापसाचे दर आणखी वाढणार की नाही याची किती शक्यता ?
बाजारातील आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2024 पासून कापसाचा दर जैसे थे असल्यासारखा आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
Gold rate today सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार ? आज सकाळी सोन्याच्या भावात मोठी बदल….
यावर्षी कापसाचा सिझन सुरू झाला तेव्हा कापसाला सात हजार दोनशे रुपये ते 7500 एवढा भाव मिळत होता. हा भाव वाढून 8000 पर्यंत जाईल असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र तशी परिस्थिती यावर्षी राहिली नाही.
कापसाचे भाव का वाढत नाहीयेत?
महाराष्ट्र राज्य कापूस फेडरेशनचे सेवानिवृत्त प्रबंधक गोविंद वैराळे म्हणाले की, “कापसाचे दर गेल्या काही दिवसापासून कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी कापसाच्या उत्पादनात झालेली लक्षणीय यामाचे प्रमुख कारण आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे“यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर 100 सेंटपर्यंत होते, ते आता 82 ते 85 सेंटपर्यंत उतरले आले आहेत.
तिसरं कारण म्हणजे सरकीचे वाढलेले भाव यावर्षी कमी झाले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत, त्यामुळे देखील कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. जोपर्यंत सरकी आणि रुईचे भाव वाढत नाहीत तोपर्यंत कापसाचा भावात वाढ होणार नाही”
विदर्भातील मुख्य कापूस अभ्यासक स्वप्निल कोकाटे यांच्या मते यावर्षी सुरुवातीला 7300 रुपयांपर्यंत कापसाला भाव मिळत होता मात्र हळूहळू हा भाव कमी होत 6800. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव कमी झाले की आपल्याकडेही भावात उतार होतो. महाराष्ट्र राज्यातील कापूस जास्त गुजरात या राज्यात निर्यात होतो यावर्षी गुजरात मध्ये देखील कापसाच्या भावात अपेक्षित अशी वाढ नाही त्यामुळे कापसाच्या भावात वाढ होईल असे दिसत नाही.
संक्रातीनंतर कापसाच्या बाजारभावात वाढ होईल का?
कापूस अभ्यासाक, गोविंद वैराळे यांच्या मते, “कापसाला सध्या 7000 ते 7500 रुपये प्रती क्विंटल एवढा दर मिळत आहे. पुढच्या काळात दर यापेक्षा खालावण्याची शक्यता कमी आहे. कापसाच्या दरात वाढ झाली तर ती 10 % होऊ शकते.”
टीप :- परंतु ही झाली शेतमाल अभ्यासक आणि मार्केटमधील तज्ञांची मते पण, यासोबत शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेतील चढ-उतार पाहता आपल्या मालाची विक्री करणे सोयीस्कर आहे. याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारची हमी देत नाही. ही झाली शेतमाल अभ्यासक आणि इंडस्ट्रीमधील कापूस पिकाशी संबंधित लोकांची मतं. पण, या मतांसोबतच शेतकऱ्यानं स्थानिक बाजारपेठेतील बाजारभावातील चढ-उतार बघून कापसाची विक्री करणं कधीही योग्य ठरू शकतं.
आजचे स्थानिक बाजारपेठेतील कापसाचे ताजे बाजार भाव..Cotton Rate Today
खाली दिलेले कापूस बाजार भाव शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आहेत स्थानिक बाजारपेठेत कापसाची कॉलिटी पाहून शंभर दोनशे रुपयांचा फरक असू शकतो..
बाजार समिती | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर | |||
---|---|---|---|---|---|---|
Cotton Rate Today 22/11/2024 | ||||||
परभणी | 6650 | 6700 | 7125 | |||
नंदुरबार | 6800 | 7000 | 7000 | |||
धुळे | 6800 | 7000 | 6900 | |||
जालना | 7025 | 7520 | 7273 | |||
अकोला | 7320 | 7450 | 7396 | |||
अकोला (बोरगावमंजू) | 7396 | 7471 | 7433 | |||
उमरेड | 6800 | 7050 | 6950 | |||
संभाजीनगर | 6600 | 6800 | 6500 | |||
बीड | 6800 | 7001 | 6900 | |||
काटोल | 6900 | 7025 | 7000 | |||
सिंदी(सेलू) | 7000 | 7200 | 7150 | |||
बार्शी – टाकळी | 7471 | 7471 | 7471 | |||
पुलगाव | 6800 | 7151 | 7025 |