गट अ , ब व क संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती बाबत GR निर्गमित दि.07.07.2025.Compassionate Staff Gr

Compassionate Staff Gr:महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क या संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबत.

वाचाः-१. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १२१७/प्र.क्र.१०२/आठ, दि.२१.०९.२०१७

२. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.अकंपा-१२२१/प्र.क्र.१८६/का-८, दि.२६.०८.२०२१

३. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे पत्र क्र. नपप्रसं/२०२४/संवर्ग कर्मचारी/अनुकंपा मार्गदर्शन/कक्ष-३अ/११०८, दि.१६.०२.२०२४

प्रस्तावना:

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ७५ मधील तरतुदीनुसार विविध संवर्गासाठी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट क), श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क गठीत करण्यात आलेली आहे. सदर सेवांकरिता नियुक्ती प्राधिकारी हे आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई असून, दिवंगत राज्यस्तरीय संवर्ग अधिकारी यांच्या वारसांना शासन सेवेत नियुक्ती देणेबाबतची प्राथमिक जबाबदारी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांची आहे. महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) श्रेणी-अ. श्रेणी व व श्रेणी क या संवर्गातील कर्मचा-यांकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दि.२९.०९.२०१७ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतूदी लागू आहेत.

घरकुल योजनेची यादी आली, लगेच आपलं नाव चेक करा, मोबाईल मधून pdf डाउनलोड करा pm awas yojana maharashtra list 2025

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क या सर्व संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य संवर्गातील गट-क श्रेणी-क मधील सातव्या वेतन आयोगानुसार ९-१३-३५४००-११२४००, ९-१०-२९२००-९२३०० या निम्नश्रेणीमधील पदावर नियुक्ती द्यावी अथवा नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या आस्थापनेवर राज्य संवर्गाव्यतिरिक्त लिपिक, किंवा इतर तत्सम पदे ज्यांची वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार ५२००-२०२०० ग्रेड वेतन १९००, सातव्या वेतन आयोगानुसार ८-६, १९९००-६३२०० किंवा त्याखालील वेतनश्रेणीमध्ये द्यावी याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने मार्गदर्शन मिळणेबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये शासनास सादर केला होता.

नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडील मार्गदर्शन मागणी प्रस्ताव व सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय विचारात घेता, नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांस अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने सूचना देण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते.

सरकारी कर्मचारी/ पेन्शन धारकांना सातव्या वेतन आयोगाची शेवटची 4% महागाई भत्ता वाढ! DA Hike News

शासन परिपत्रक:-

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी हे गट-क संवर्गातील असून, अनुकंपा नियुक्तीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या प्रचलित तरतुदीनुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसास राज्य संवर्गाव्यतिरिक्त नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील लिपिक, वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार ५२००-२०२०० ग्रेड वेतन १९०० (सातव्या वेतन आयोगानुसार ८-६, रू.१९९००-६३२००) या वेतनश्रेणीमध्ये अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी.

राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील लिपीक पदावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील दि.२६.०८.२०२१ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदींना अनुसरून नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने निश्चित करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७०७१८३६३४३९२५ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट 8th Pay Commission

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

img 20250708 0656123763132961478076786

Leave a Comment