अरे बापरे मांजरीने घेतला नागाशी पंगा… सरळ नागाच्या फण्याला ओरबाडले अन्… VIDEO पाहून अंगावर येईल काटा. Cat and Snake Viral Video

Cat and Snake Viral Video: विषारी नागाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. साप, नाग, अजगर या सर्व जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. अनेकदा सोशल मीडियावर यांचे अनेक व्हिडीओ, फोटोदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांमध्ये सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यात साप कधी घरामध्ये लपलेला पाहायला मिळाला तर काही व्हिडीओंमध्ये साप मुंगूसाबरोबर भांडण करताना दिसला होता. पण आताच्या व्हिडीओमध्ये नाग चक्क मांजरीबरोबर भांडण करताना दिसतोय.

मांजर असो किंवा श्वान, या दोन्ही प्राण्यांना अनेक जण खूप जीव लावतात, त्यांचा सांभाळ करतात; घरातील इतर सदस्यांप्रमाणेच त्यांना महत्त्व देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. त्यांचे वाढदिवस साजरे करतात, त्यांचे खूप लाड करतात. अनेकजण या प्राण्यांना एवढा लोक जीव का लावतात? असे प्रश्न विचारतात. पण, खरंतर मुक्या प्राण्यांना जीव लावणं कधीही व्यर्थ जात नाही. हे प्राणी योग्य वेळी आपल्या मालकाच्या मदतीला धावून येतातच. आजपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. ज्यात हे प्राणी अडचणीत सापडलेल्या मालकाची मदत करताना दिसले आहेत. आताही असाच एक व्हिडीओ समोर आलाय.

तुम्ही कधी एखाद्या मांजर आणि नागच्या लढतीचा व्हिडिओ पाहिला आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये मांजरीला नाग आल्याचे दिसताच मांजर नागाला पळवून लावण्यासाठी त्याच्या हल्ला करते. यावेळी नागही मांजरीला फणा काढून घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी मांजर नागाला फटकारते आणि दूर ढकलते आणि पुन्हा नागावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. नाग आणि मांजरीच्या भांडणाचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ:

Leave a Comment