BMC Recruitment 2026:बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील गट ‘ड’ संवर्गामधील, ‘कामगार’ पदासाठी ३८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रु.18,000-56,900 (Pay Matrix-M9) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील ‘कामगार’ संवर्गातील ३८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी, सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/Careers-All/Recruitment/Chief Labour Officer या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर जाहिरात दि.२३.०१.२०२६ ते दि.१८.०२.२०२६ या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरुन सदर पदासाठीची विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन, जाहिरातीमधील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा.
उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ कॉलसेंटर, भ्रमणध्वनी क्रमांकः ९५१३१६७४४३ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा व ऑनलाईन पध्दतीने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फी स्वीकृतीचा कालावधी अंतिम दिनांक
: दिनांक २८.०१.२०२६
: दिनांक १८.०२.२०२६ (२३.५९ पर्यंत)