BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2026) जिंकली तर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना महापौरपदी बसवण्यात येईल, असा दावा चित्रे यांनी केला आहे.
अखिलेश चित्रे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले… त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, “मुंबईचा महापौर मराठी असेल का?” त्यावर फडणवीस म्हणतात,
“महापौर महायुतीचाच होणार…” शेलार म्हणतात, “महापौर हिंदू होणार…” पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही कि, महापौर मराठीच होणार ! ह्याचाच अर्थ त्यांचा मुंबई ‘महापौर’पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय…मोहित कंबोज ठरलाय ! मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा, असे आवाहन अखिलेश चित्रे यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे.
मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये: शासनाचे मोठे नियोजन.Ladki Bahin Yojana
अखिलेश चित्रे यांच्या या दाव्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Mumbai Mahanagarpalika Nivadnuk 2026)