Birth Death Certificate Document:जन्म किंवा मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी २१ ते ३० दिवसांत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करावी लागते. ३० दिठसांनंतर एक वर्षाच्या आत दंड भरून नोंदणी करता येते.
मात्र, एक वर्षानंतर नोंदणी केली नाही तर जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज सादर करून त्यांच्या आदेशाने दाखला घ्यावा लागतो. अशावेळी संबंधितांना अनेक अडचणी येतात, वेळेत दाखला मिळत नाही. त्यामुळे वेळेतच नोंदणी करणे गरजेचे असते.
शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, पासपोर्ट, नौकरी, मतदानाचा हक्क, वारसा हक्क यासारख्या अनेक बाबी जन्म व मृत्यूच्या नोंदणीशी वेट ओडलेल्या असल्याने बैलेत नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
जन्मानंतर नोंदणी आता होतो हॉस्पिटलमध्येच
जन्म नोंदणीचे अधिकार आता शासनाने संबंधित हॉस्पिटलला दिलेले आहेत. प्रसूतीनंतर हॉस्पिटलमध्ये नोंदणी झाल्यानंतर महापालिकेतून अथवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज केल्यानंतर दाखला मिळतो.
घरी प्रसूती झाली तर महापालिका अथवा संबंधित कार्यालयात जाऊन २१ दिवसांच्या आत जन्माची नोंदणी करणे गरजेचे आहे. पुढे १ वर्षाच्या आत नोंदणी करता येते मात्र, दंड भरावा लागतो.
२१ दिवसांनंतर अर्ज केला तर…
जन्मा किंवा मृत्यूची नोंदणी २१ दिवसांनंतर केली तर दंड आकारून महापालिकेला दाखला देता येतो. एक वर्षानंतर मात्र तहसीलदारांकडे अर्ज सादर करावा लागतली.
जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात
जन्म: रुग्णालयाचे जन्म प्रमाणपत्र किया डिस्चार्ज कार्ड, पालकांचे आधार कार्ड, घरी जन्म झाला असल्यास, ग्रामपंचायत/स्थानिक प्राधिकरणाचे पत्र, पालकांचे प्रतिज्ञापत्र.
मृत्यू: डॉक्टरांचे रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीचे आधार कार्ड किंवा ओळखीचा पुरावा, स्मशानभूमी/कब्रस्तानचा दाखल
शासनाने रुग्णालयांना अधिकार दिले असल्याने आता जन्म-मृत्यूची नोंद संबंधित हॉस्पिटलध्ये केली जाते.
संबंधितांनी महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर त्यांना दाखला दिला जातो. मात्र, अन्य ठिकाणी जन्म अथवा मृत्यू झाला, तर २१ दिवसांत नोंदणी अपेक्षित आहे.
पुढे १ वर्षाच्या आत दंड भरून नोंद करता येते. त्यानंतर मात्र या दाखल्यासांठी तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. शहरात प्रभाग कार्यालयातही जन्म-मृत्यू नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
कुठे करावी लागते नोंद ?
रुग्णालयात जन्म किंवा मृत्यू झाला तर संबंधित रुग्णालयात नोंद होते. मात्र, जन्म अथवा मृत्यू इतर ठिकाणी झाला झाला तर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका या कार्यालयात जाऊन अर्ज भरून नोंदणी करावी लागते
जन्म नोंदणी
कशासाठी आवश्यक?
मुलाला शाळेत दाखल
करण्यासाठी, शिष्यवृत्ती, वयाचा पुरावा, पासपोर्ट, मतदानाचा हक्क, आधार कार्ड यासह इतर शासकीय कामांसाठी जन्म दाखला आवश्यक आहे.
मृत्यू नोंदणी कशासाठी आवश्यक ?
घरातील सदस्याचा मृत्यू झाला तर त्यासंबंधी नोंदणी करणे त्याच्या वारसांची जबाबदारी असते. वारसा हक्कासाठी वारसांना हा दाखला आवश्यक असतो.