बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 रिक्त पदांची भरती सुरू.Bank Of Recruitment 2025

Bank Of Recruitment 2025:बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 रिक्त पदांची भरती सुरू

बँक ऑफ महाराष्ट्रने देशभरातील विविध शाखा, कार्यालये आणि कार्यक्षेत्रांमध्ये स्केल II जनरलिस्ट ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 500 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी 13 ऑगस्ट 2025 पासून 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. अधिकृत अधिसूचना व अर्जाची लिंक उमेदवारांना bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

जाहिरात येथे पहा

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवारांकडे भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी (सर्व सेमिस्टर/वर्षांचे एकत्रित गुण 60% आवश्यक, तर SC/ST/OBC/PwBD साठी किमान 55% गुण) असणे बंधनकारक आहे. तसेच, चार्टर्ड अकाउंटंट उमेदवारांनाही अर्ज करता येईल.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय किमान 22 वर्षे ते कमाल 35 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

वेतन आणि सेवा अटी

निवड झालेल्या उमेदवारांना स्केल II अंतर्गत प्रारंभीचे वेतन दिले जाईल. भरतीनंतर 6 महिन्यांची परीविक्षा (Probation Period) असणार आहे. तसेच उमेदवारांना 2 लाख रुपयांचा बांड भरावा लागणार असून किमान 2 वर्षे सेवा देणे बंधनकारक असेल.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर गुणवत्तेनुसार यशस्वी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल. ऑनलाइन परीक्षेला 150 गुण तर मुलाखतीस 100 गुण राहतील. अंतिम गुणांची मोजणी 75:25 (परीक्षा:मुलाखत) या प्रमाणात केली जाईल.

अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.bankofmaharashtra.in) जाऊन अर्ज करावा.

“Career → Recruitment Process → Current Openings” या पर्यायावर क्लिक करावे.

“Recruitment of Officers in Scale II Project 2025-26” ही लिंक उघडावी.

“Apply Online” या बटणावर क्लिक केल्यावर अर्ज फॉर्म स्क्रीनवर दिसेल.

दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरून सबमिट करावा.

या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना पीडीएफ बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि इतर अटींची खात्री करून घ्यावी.

 

Leave a Comment