बांधकाम कामगारांसाठी मोफत किचन किट योजना 2025 – घरपोच मिळणार गरजेच्या वस्तू! Bandhkamgar Kitchen Kit Yojana

Bandhkamgar Kitchen Kit Yojana:महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी एक अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे. “बांधकाम कामगार किचन किट योजना 2025” या योजनेअंतर्गत, पात्र मजुरांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या काही आवश्यक वस्तूंचा एक संपूर्ण संच मोफत दिला जाणार आहे.

किचन किटमध्ये काय मिळेल?

या योजनेत एकूण ११ उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे, जसे की:

पत्र्याची पेटी

प्लास्टिकची चटई

25 किलो धान्य साठवण्यासाठी डब्बा

22 किलो क्षमतेचा आणखी एक डब्बा

बेडशीट

चादर

ब्लँकेट

1 किलो साखर ठेवण्यासाठी डबा

500 ग्रॅम चहा पावडर ठेवण्यासाठी डबा

18 लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर

सर्व साहित्य ठेवण्यासाठी एक मोठी पेटी

योजना कोणासाठी आहे? (पात्रता)

कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असले पाहिजे.

1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर.Land records 2025

कामगार सध्या कार्यरत असावा

महाराष्ट्राचा रहिवासी असावा

वैध स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

स्मार्ट कार्ड (कामगार कार्ड)

आधार कार्ड

नोंदणीकृत मोबाइल नंबर

अर्ज कसा करायचा?

✅ ऑफलाइन पद्धत

अर्जाचा फॉर्म भरून तो जिल्हा किंवा तालुका कामगार सुविधा केंद्रात जमा करावा

काही भागात ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे (सायबर कॅफेमधून करता येतो)

अर्ज फी

अर्ज करताना थोडीशी शुल्क आकारली जाऊ शकते. याबाबत अधिक माहिती स्थानिक कार्यालयातून मिळेल.

वितरण प्रक्रिया

सर्व वस्तू योग्य तपासणी झाल्यावरच वितरित केल्या जातील

वितरणाची जबाबदारी कामगार आयुक्त कार्यालय आणि जिल्हा कामगार केंद्र यांच्याकडे असेल.

या बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! GR 24-06-2025 | Important government decision regarding implementation of lump sum loan repayment scheme

किट मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना पोचपावती दिली जाईल

योजनेचे फायदे

घरातील रोजच्या गरजांसाठी उपयोगी वस्तू मिळणार

सगळ्या वस्तू टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येण्याजोग्या

यामुळे कामगारांच्या घरखर्चात थोडा दिलासा मिळणार

महत्त्वाच्या सूचना

योजना 20 जून 2025 पासून सुरू झाली आहे

सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा

अर्ज करण्यापूर्वी अटी वाचून समजून घ्या

अधिक माहितीसाठी जवळच्या कामगार कार्यालयात संपर्क साधा

बांधकाम कामगार किचन किट योजना 2025 ही मजुरांसाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर लगेच अर्ज करा आणि तुमच्या कुटुंबासाठी उपयोगी साहित्य मिळवा – तेही मोफत!

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment