Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र, हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलं आहे.

एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, अशोक खरातची नवीन मोडस ऑप्रेंडी समोर आली आहे. ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी अशोक खरात स्वतंत्र यंत्रणा राबवत होता. त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाबड्या ग्राहकांची आधीच माहिती मिळवत होता, असा पोलिसांना संशय आहे. नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण? शत्रू कोण? जीवनातील काही चढ-उतार याबाबतीत माहिती जाणून घेण्याचा अशोक खरात प्रयत्न करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र- (Ashok Kharat Marathi News)

कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्रांचा वापर करत होता. हॉट रिडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते. तर कोल्ड रिडिंगमध्ये पाहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जातं. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग करत होता.

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल- (Ashok Kharat Case)

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ टाकणाऱ्या राहुल शिंदे, त्याला व्हिडीओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्याविऱोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर योगेश आढावला व्हिडीओ पाठवणाऱ्या बीडच्या माजलगावमधील संदिप गरजेवरही गुन्हा दाखल झालाय. तर सोशल मीडियावर पिढीत महिला, किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख निर्माण होईल असे ओरिजिनल किंवा एआय व्हिडीओ व्हायरल केले तर ग्रुप ऍडमिनसह मेसेज सेंड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा एसआयटी प्रमुखांनी दिला आहे.

अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे.

गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas