Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावाAjit Pawar Plane Crash News: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची सीआयडीने ३ दिवस चौकशी केली. या चौकशीत त्यांनी वैमानिक सुमित कपूरची चूक असल्याचे सांगत आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून, या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातासाठी वैमानिक सुमित कपूर याची चूक कारणीभूत असल्याचे संकेत मिळत आहेत. व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी सीआयडीसमोर (CID) दिलेल्या जबाबामुळे या तपासाला नवे वळण मिळाले आहे.
सीआयडीकडून 3 दिवस कसून चौकशी
सीआयडीच्या पथकाने व्ही.के. सिंग यांची गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान सिंग यांनी अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याबाबत सविस्तर माहिती दिली. व्ही के सिंग यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे नमूद केले आहे की, वैमानिक सुमित कपूर याच्याकडून झालेल्या चुकीमुळेच हा भीषण अपघात घडला असावा.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
“या अपघात प्रकरणात जर माझी काही चूक असेल किंवा कंपनीच्या वतीने काही त्रुटी राहिली असेल, तर मला कठोर शिक्षा करा,” असे विधान करत व्ही के सिंग यांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
तपासातील महत्त्वाचे टप्पे
सीआयडी आता या विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि एटीसी (ATC) कडील संभाषणाची पुन्हा एकदा पडताळणी करत आहे. सुरुवातीला खराब हवामानामुळे अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात असताना, आता पायलटच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विमानाचे मेंटेनन्स आणि उड्डाण करण्यापूर्वी देण्यात आलेली परवानगी यावरही आता प्रश्न विचारले जात आहेत.
व्ही.के. सिंग यांनी दिलेल्या या जबाबामुळे आता पायलटकडून नेमकं काय घडलं, हे शोधण्याचे मोठे आव्हान सीआयडीसमोर आहे. सीआयडी आता वैमानिक सुमित कपूर यांच्या मागील उड्डाणांचा रेकॉर्ड आणि त्या दिवशीची त्याची मानसिक व शारीरिक स्थिती याबाबतही माहिती गोळा करत आहे. या प्रकरणात लवकरच काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.