अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट! महत्वाचा होणार खुलासा; केंद्रीय उड्डाण मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय.Ajit Pawar Death Case Inquiry

Ajit Pawar Death Case Inquiry: राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मोठी आपडेट समोर आली आहे.

यासंदर्भात सातत्यानं घातपाताचे आरोप होत असताना केंद्र सरकारनं आता महत्वाचं पाऊल उचललं आहे. यामुळं या विमान अपघातप्रकरणी महत्वाचा खुलासा होणार आहे.

अजित पवारांच्या अपघाती निधनावर सातत्यानं संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी सातत्यानं विविध प्रकारचे संभाव्य पुरावे सदृश्य गोष्टी माध्यमांसमोर आणून या अपघाताबाबतच्या चर्चांनी अधिक गंभीर स्वरुप धारण केलं आहे.

यासाठी अनेक प्रकारच्या कॉन्सिरन्सी थिअरी सांगितल्या जात आहेत. खुद्द पवार कुटुंबातील व्यक्तींनीच यासंदर्भात सातत्यानं संशय व्यक्त करुन चौकशीची मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर आता केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) विमान अपघात चौकशी ब्युरोला या अपघाताच्या चौकशीचे आदेश केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे हा ब्युरो केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही

पण त्यांना जगभरातील कोणत्याही एजन्सीकडून चौकशीसाठी मदत घेऊन चौकशी करण्याची परवानगी असते. माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळातच या विशेष ब्युरोची स्थापना झाली होती. आता त्याच यंत्रणेमार्फत अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment