आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करणे, सेवा केंद्रांवरुन देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत aaple sarkar shetu kendra

aaple sarkar shetu kendra:आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करणे, सेवा केंद्रांवरुन देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत…

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक- आसेकें-१७२५/प्र.क्र. ८६/मातं (३९)हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई- ४०००३२

दिनांक :- २७ मार्च, २०२५

संदर्भ: १) शासन निर्णय, सिओएम १००२/प्र.क्र.२४०/०२/३९, दि. २३ ऑगस्ट, २००२

२) शासन निर्णय, क्रमांक क्र. मातंर्स/प्र.क्र. २८/३९, दिनांक ३ डिसेंबर, २००८

३) शासन निर्णय, मातसं २०१२/प्र.क्र. १५२/३९, दिनांक २३ मे, २०१२

४) शासन निर्णय, ०४७/१/२०१४/३९, दिनांक ५ सप्टेंबर, २०१४

५) शासन निर्णय, क्रमांक मातंसं १७१६/प्र.क्र. ५१७/३९ दिनांक ५ डिसेंबर, २०१६

६) शासन निर्णय, क्रमांक मातंसं १७१६/प्र.क्र. ५१७/३९ दिनांक १९ जानेवारी, २०१८

प्रस्तावना :-महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होणे ही काळाची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा/लाभ मिळविण्यासाठी लागणारा श्रम, निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या कमी असल्याकारणाने सन २०११ ची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधिन क्र. ६ येथील शासन निर्णय क्र. मातंसं-१७१६/प्र.क्र.५१७/३९, दि. १९ जानेवारी, २०१८ मधील परिच्छेद क्र.१ अन्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापना करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय निर्गमित होऊन साडेसहा वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे.

दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेता, संदर्भाधीन शासन निर्णय दि.१९ जानेवारी, २०१८ मधील परिच्छेद क्र. १ अन्वये ठरवून दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याच्या निकषात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवरुन नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर शासन निर्णय दि. ०३.१२.२००८ अन्वये रु.२०/- ठरविण्यात आले होते.

दिवसेंदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि महाआयटी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचेकडून सेवांचे दर वाढविणेबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करणे आवश्यक झाले.

तसेच, आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरीकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवा पुरविणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुषंगाने मा. मंत्री, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य यांनी विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदनही केलेले आहे

शासन निर्णयः-सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मातंसं-१७१६/प्र.क्र.५१७/३९, दिनांक १९ जानेवारी, २०१८ मधील परिच्छेद क्र.१ अन्वये ठरवून दिलेली लोकसंख्या आणि आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या याबाबतच्या निकषात खालीलप्रमाणे बदल करुन आपले सरकार सेवांची संख्या वाढविण्यात येत आहे.:-

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अ) प्रत्येक ग्राम पंचायत क्षेत्रात २ आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात येईल. मात्र, ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) असलेल्या ग्राम पंचायतीत किमान ४ केंद्रे स्थापन करण्यात येईल.

आ) शहरी भागांसाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी खालील निकष राहतील. (२०११ च्या जनगणनेनुसार):-

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र- २५००० लोकसंख्येसाठी २ केंद्र इतर महानगरपालिका व नगरपरिषद- १०००० लोकसंख्येसाठी २ केंद्र प्रत्येक नगर पंचायत क्षेत्रात किमान दोन आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात येईल.

IMG 20250328 WA0010

Leave a Comment