दोन सिंहांमध्ये भयंकर लढाई; गडगडाटी डरकाळ्या, पंजांचा प्रहार व रक्तरंजित थरार, शेवटी कोण पडलं कुणावर भारी, पाहा VIDEO. Lion viral Video

Lion viral Video: दाट जंगलात एकाएकी गडगडाटी डरकाळी घुमते आणि सगळीकडे जाणवणाऱ्या नीरव शांततेचे रूपांतर क्षणार्धात तुटून जाते. पक्ष्यांचे थवे घाबरून आकाशात झेपावतात, झाडांच्या पानांत एक अजब खळबळ निर्माण होते आणि वाऱ्याच्या आवाजानेसुद्धा. जिथे तिथे भयाकुल वातावरण निर्माण होते. कारण- तो आवाज असतो जंगलाच्या खऱ्या राजाचा– सिंहाचा. पण जर एकाच जंगलातील दोन बलाढ्य सिंह एकमेकांसमोर आले आणि वर्चस्वासाठी भिडले, तर ती झुंज किती भीषण असेल याची फक्त कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. एक पंजा जणू विजेच्या झटक्यासारखा, एक उडी जणू वादळाच्या तडाख्यासारखी! कोण वरचढ ठरेल आणि कोण हरेल, हे जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येक क्षणी वाढतच जाते. अशाच एका थरारक प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चक्क वणव्यासारखा पसरला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या मडिक्वे गेम रिझर्व्हमध्ये घडलेल्या या भयंकर संघर्षाने इंटरनेट हादरून गेले आहे. पाहणाऱ्यांना असं वाटतंय की, जणू दोन ग्रह एकमेकांवर आदळतायत आणि या झुंजीचा शेवट काय झाला याचा ताण प्रेक्षकांच्या मनात शेवटच्या सेकंदापर्यंत कायम राहतो…

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कल्पना करा की, एखाद्या बब्बर सिंहाच्या एका दणदणीत डरकाळीनेच जर संपूर्ण जंगल थरथर कापत असेल, तर दोन सिंह एकमेकांसमोर उभे ठाकले, तर काय होईल? याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. पण, दक्षिण आफ्रिकेतील मडिक्वे गेम रिझर्व्हमधील एका थरारक वास्तवाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे आणि सध्या ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तब्बल ७७ हजार रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान, असा करा अर्ज. Gay Gotha Anudan Yojana

हे भीषण दृश्य फोटोग्राफर तेबात्सो रोज टेमा यांनी टिपले असून, ते @lionsightings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये दोन वेगवेगळ्या कळपांतील सिंह एकमेकांवर तुटून पडतात. दोघांच्याही शरीरयष्टीत ताकद आणि रुबाब ओसंडून वाहत असल्याने नेमका कोण वरचढ ठरणार हे भाकीत करणे जवळपास अशक्य होते.

सुमारे ४५ सेकंद चाललेल्या या जीवघेण्या संघर्षात दोन्ही सिंह एकमेकांवर अक्षरशः कहर बनून झेपावतात. एका क्षणी एक सिंह दुसऱ्याला जमिनीवर पाडतो, तेव्हा वाटतं की, आता त्याचा विजय निश्‍चित आहे. पण, दुसरा सिंह हार मानणं तर दूरच; त्याच्या बलाढ्य पंजांनी उलट जबरदस्त प्रतिहल्ला करून पहिल्यालाच हादरवून टाकतो. या काट्याकाटीच्या झुंजीत रक्त उसळेल की काय, अशी भीती निर्माण होते; पण शेवटी कोणताही स्पष्ट निकाल लागला नाही. थोड्याच वेळात दोन्ही सिंह आपापल्या वाटेने निघून जातात.

Leave a Comment