Lalbaugcha Raja 2025: वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहण्याऱ्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात.
पण, गणरायाच्या उत्सवाला सुरुवात होत नाही तेच पुन्हा एकदा मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडळात धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे.
राज्यात १८ हजार शाळा बंद होणार! एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा Maharashtra School News
लालबागच्या राजाच्या मंडपात एका महिला भाविकाला सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यावर्षीही मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची एकच गर्दी उसळली आहे. सकाळपासून भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी एका महिला भाविक आणि सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी भाविक महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं.
लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी जास्त वेळ रांगेत थांबू द्यावी, अशी मागणी या महिलेनं केली. पण, गर्दी जास्त असल्यामुळे महिला भाविक आणि सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक चकमक उडाली.
यावेळी तिथे तैनात असलेल्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. महिला भाविक आणि सुरक्षारक्षांना बाजूला केले. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर दुसरीकडे मात्र VIP रांगेतल्या लोकांना सेल्फीसाठी पुरेसा वेळ दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजाच्या दरबारात अशाप्रकारचे भेदभाव केल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा