ठाणे लोकलमध्ये तरुणीच्या बाजूला बसून तरुणाचं घृणास्पद कृत्य; लक्षात येताच तरुणी धाडकन उठली अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल. Thane local viral video

Thane local viral video: महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अगदी घरातल्या महिलांवरही अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक आजूबाजूचं भान न राखता, आपली मनमानी करतात. तसेच, हे आंबटशौकीन सार्वजनिक ठिकाणीही अश्लील कृत्य करताना मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना ठाणे लोकलमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणची सुरक्षितता आणि सामाजिक वर्तन याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी १:३० वाजता ठाणे ते वाशीदरम्यानच्या हार्बर लाइनच्या ट्रेनमध्ये एक प्रवासी हस्तमैथुनासारखे अश्लील कृत्य करताना पकडला गेला. तरुणीच्या बाजूला बसून हा माणूस हस्तमैथुन करीत असल्याचे दर्शविणारा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

हा सगळा प्रकार समोरच्या सीटवर बसलेल्या तरुणानं व्हिडीओमध्ये कैद केला आणि बाजूला बसलेल्या तरुणीला तेथील सीटवरून उठण्यास सांगितले. यावेळी हा प्रकार तरुणीच्या लक्षात येताच ती धाडकन सीटवरुन उठली आणि तरुणाला मारू लागली. यावेळी इतर प्रवाशांनीही मध्यस्थी करीत तरुणाला चोप देत ट्रेनमधून खाली उतरवले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्या घृणास्पद कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एकानं म्हटलंय, “बापरे, अशा माणसांना खूप बेदम चोप दिला पाहिजे.” तर आणखी एकानं, “तुझ्यासारखे लोक असले तर पुरुषांच्या डब्यातही महिला सुरक्षित राहू शकतात” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment