वयाची अट विसरा; राज्यात १५ हजार पोलिसांची भरती जिल्हास्तरावर होणार निवड,तरुणांना मिळणार नोकरीची संधी Police Bharti 2025

Police Bharti 2025:राज्य सरकारने पोलिस दलात १८,६३१ पोलिस शिपायांच्या भरतीचा जीआर काढला आहे. सन २०२२ व २०२३ मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्यास पात्र ठरवले आहे. ही भरती जिल्हास्तरावरून राबवली जाणार आहे. यामुळे हजारो तरुणांना पोलिस खात्यातील नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

अनेक वर्षांपासून ‘खाकी’चे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे, त्यामुळे उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून, बारावीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनी त्याकरिता तयारी सुरू केली आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पोलिस भरतीची शक्यता स्वराज्य असल्याची चर्चा आहे. त्यानंतर अर्ज नोंदणीत पात्र ठरलेल्यांची मैदानी

प्रक्रिया अशी होणार

पोलिस भरतीसाठी उमेदवारांना एकाच अर्जाची परवानगी, एकाच दिवशी लेखी परीक्षा, प्रथम ५० गुर्णाची शारीरिक चाचणी, चाचणीनंतर एका पदास १० उमेदवारांची निवड होईल.

चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार लेखी परीक्षा होईल. त्यानंतर प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी जाहीर करणे, या स्वरूपात भरती होण्याची शक्यता आहे.

मुंबई पुण्यात मोठी संख्या

राज्यभरात १५ हजार पोलिस शिपायांची भरती होणार असून पुणे, मुंबई, नाशिक, आदी शहरी भागात ही संख्या मोठी आहे.

या पदांसाठी भरती

या भरती प्रक्रियेत पोलिस शिपाई आणि वाहनचालक या पदांसाठी निवडी केल्या जाणार आहेत अशी घोषणा शासनाने केली आहे.

वयोमर्यादा ओलांडलेल्यांना मिळणार संधी

सन २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्यास पात्र ठरवले आहे.

१०० गुणांची लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी राज्यभरात पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. शारीरिक व लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर होईल.

Leave a Comment