लाडकी बहीण योजना नवीन महत्वाचे शासन परिपत्रक जारी!Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana:विषय:-“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी/कर्मचारीऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत.

संदर्भ:- महिला व बाल विकास विभागाचे पत्र क्र. मबावि २०२४/प्र.क्र. १५७/का.०२, दि. २९.०७.२०२५

महोदय,

सोबत जोडलेल्या संदर्भाकीत पत्राचे कृपया अवलोकन व्हावे.

२. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या (DATA) अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठविली आहे.

सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी/कर्मचारी पात्र नसताना सुध्दा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेवून शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करणेबाबत कळविले आहे.

लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

३. सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठविलेल्या यादीमध्ये एकूण ११८३ नावे समाविष्ट आहेत. सदरचे अधिकारी/कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत.

जिल्हा परिषदा स्वयत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आहेत.

त्यामुळे विषयांकीत प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करुन द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करुन द्यावी.

राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनात चार आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर ! State Employees Salary Hike

IMG 20250818 WA0495

Leave a Comment