IBPS Clerk Recruitment 2025:इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक (Clerk) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एकूण 10,277 लिपिक पदे भरण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून 21 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.ibps.in या ठिकाणी भेट द्यावी लागेल.
या भरतीअंतर्गत लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची न्यूनतम वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे. वयाची गणना करण्यासाठी उमेदवार IBPS द्वारे दिलेला Age Calculator वापरू शकतात. शैक्षणिक पात्रता पदाच्या गरजेनुसार असून मूळ जाहिरात वाचून खात्री करून घ्यावी.
IBPS Clerk भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे:
पूर्व परीक्षा (Prelims) – 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा (Mains) – 29 नोव्हेंबर 2025
कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी
या परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹850/-, तर अनुसूचित जाती-जमाती व महिला उमेदवारांसाठी ₹175/- इतके आहे. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाईल.
लिपिक पदासाठी वेतनश्रेणी ₹24,050 पासून सुरू होऊन वेतनवाढीच्या टप्प्यांनुसार ₹64,480 पर्यंत जाऊ शकते. भरतीसंबंधी अधिक माहिती, PDF जाहिरात आणि अर्ज लिंक्स खाली दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
🔗 महत्वाच्या लिंक्स
टीप : ही भरती संधी खूप मोठी असून इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा. ही माहिती आपल्या मित्रपरिवारात शेअर करावी जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना याचा फायदा होईल.