Indian Railway Recruitment 2025:रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) तर्फे 2025 साली पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी संधी जाहीर करण्यात आली आहे. RRB NTPC भरती 2025 अंतर्गत CEN 03/2025 व 04/2025 या अधिसूचनेनुसार एकूण 30,307 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
ही भरती Non-Technical Popular Categories (NTPC) मध्ये केली जात असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. या संधीचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती अंतर्गत पदांची यादी व पगार
या भरतीमध्ये पदवीधर पात्रतेसाठी खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:
मुख्य व्यावसायिक व तिकीट पर्यवेक्षक – 6235 पदे (Level 6, प्रारंभिक पगार ₹35,400)
स्टेशन मास्टर – 5623 पदे (Level 6, ₹35,400)
गुड्स ट्रेन मॅनेजर – 3562 पदे (Level 5, ₹29,200)
कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक – 7526 पदे (Level 5, ₹29,200)
वरिष्ठ लिपिक व टंकलेखक – 7367 पदे (Level 5, ₹29,200)
शैक्षणिक पात्रता
या सर्व पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी. टंकलेखक पदांसाठी टायपिंग स्कील टेस्ट आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, कोविड-19 मुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 3 वर्षांची सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
CBT-1 (प्रथम संगणक आधारित परीक्षा)
CBT-2 (द्वितीय संगणक आधारित परीक्षा)
टायपिंग/अप्टिट्यूड टेस्ट (लागू असल्यास)
कागदपत्र तपासणी
वैद्यकीय चाचणी (A2, B2, C2 प्रमाणे)
अर्ज कसा कराल?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.indianrailways.gov.in
RRB NTPC अधिसूचना (CEN 03/2025 आणि 04/2025) डाउनलोड करा
नवीन नोंदणी करा, अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अर्ज फी भरा आणि अंतिम सबमिशन करा
सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू: 30 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59)
ही भरती सरकारी नोकरीची उत्तम संधी असून 7व्या वेतन आयोगानुसार चांगला पगार व अनेक भत्ते यामध्ये मिळतात. संगणक आधारित परीक्षा प्रणालीमुळे निवड प्रक्रिया पारदर्शक असून पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे!
अधिकृत अधिसूचना व अर्ज लिंक लवकरच उपलब्ध केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता तयारी सुरू करावी.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा