अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जाहीर ; नवीन GR निर्गमित | Comprehensive revised policy on compassionate appointment announced

Comprehensive revised policy on compassionate appointment announced:अनुकंपा नियुक्ती योजना १९७६ पासून लागू करण्यात आली आहे. सन १९९४ मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करुन नवीन सुधारीत योजना निर्गमित करण्यात आली. त्यानंतर सन १९९४ च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते.

सदर अनुकंपा धोरणात खालील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

१) न्यायालयीन अडचणी प्रामुख्याने खालील न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत.

कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणे.

प्रतिक्षासूचीवरील उमेदवार बदलणे.

प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे.

या विविध न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीवाच्या Larger Bench ने रिट याचिका क्र.३७०१/२०२२ (श्रीम. कल्पना विलास तारम व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर व इतर संलग्न रिट याचिकांमध्ये दि.२८.०५.२०२४ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करणे आवश्यक आहे.

२) अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीतील विलंब अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे. तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज निदर्शनास आली.

३) योजनेचे सुलभीकरण आवश्यक सन १९९४ पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत एकूण ४५ आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात. तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सर्व आदेशांचे एकत्रिकरण करणे,

उपरोक्त कारणमीमांसा विचारात घेवून, प्रचलित अनुकंपा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

उपरोक्त प्रस्तावना विचारात घेवून, संदर्भाधीन सर्व शासन आदेश अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात येत आहे.

(1) अनुकंपा नियुक्ती धोरणातील मुलभूत तरतूदी –

नवीन शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment