जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण बाबत… राजपत्र (तुकडे बंदी कायदा) Land fragmentation ban Government Gazette

Land fragmentation ban Government Gazette: महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम.

क्रमांक एकत्रि-२०२१/प्र.क्र.७४/ल-१. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम (१९४७ चा मुंबई ६२) याच्या कलम ३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचना, आदेश किंवा इतर कोणतेही संलेख यांचे अधिक्रमन करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, पुढील क्षेत्र वगळून, प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांची क्षेत्रे ही, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी स्थानिक क्षेत्रे असतील असे अधिसूचित करीत आहे:-

अतिशय महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा

(१) महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती याच्या हद्दीमधील क्षेत्र;

(२) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७) अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्राखालील निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्रे;

(३) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा. ३७) अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्रे;

(४) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) याच्या कलम ४२ड अन्वये निश्चित केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य पक्षेत्रासाठी वाटप केलेले, कोणत्याही गावाच्या, शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील, अशा नगरच्या किंवा शहराच्या लगत असलेले ” परिघीय क्षेत्र ”

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 सर्व्हेक्षण मुदतवाढ ३१ जुलै २०२५ पर्यंत आहे…फॉर्म कसा भरावा व्हिडिओ पहा -PM Awas Yojana Survey 2025

(१)महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

IMG 20250720 WA0055

Leave a Comment