PM Awas Yojana Survey 2025:विषय : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षणाबाबत (Awaas+ २०२४ Survey).
संदर्भ : मा. संचालक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. F.No.M-१२०१६/३/२०२५- RH-Pol (e-३९१५२१), दि.१७ जुलै, २०२५.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये, मा. संचालक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी Awaas+ २०२४ चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे.
यासंदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. आपल्या जिल्ह्यातील आवास प्लस सर्वेक्षण २०१८ मधील प्रतिक्षा यादीत (Priority List) समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबांचे (Potentially eligible households under PMAY-G) प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नवीन १० Exclusion Criteria नुसार दि.३१ जुलै, २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करुन कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२. ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व ग्रामपंचायतीना आवास सॉफ्ट प्रणालीवर “सर्वेक्षण पूर्ण” (Survey Completed) झाल्याचे दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंत चिन्हांकित (Mark) करण्यात यावे.
३. जिल्ह्यातील १००% स्वयं-सर्वेक्षण (Self-Survey) प्रकरणांचे सर्वेक्षकांद्वारे पुष्टीकरण (Corroboration) करण्याची कार्यवाही दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.
४. Self व Assisted Survey द्वारे ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे Flagged केले आहे, अशा कुटुंबांचे Checker द्वारे Verification करण्याची कार्यवाही दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.
५. या पुढे सर्वेक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.