8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात पगार 30 ते 34 टक्क्यांनी वाढणार, पगारवाढीचा फायदा किती कर्मचाऱ्यांना होणार?

8th Pay Commission:केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. द इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार अम्बित कॅपिटलच्या रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा फायदा जवळपास 1 कोटी 10 लाख जणांना होणार आहे.

आठव्या वेतन आयोगानुसार बदलणाऱ्या वेतनश्रेणीची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून होणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्याची गरज आहे. त्यानंतर वेतन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.

तुकडाबंदी कायद्याचा तुकडा अखेर पडला, 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी, कायद्यातील जाचक अटी शिथिल,असा होणार फायदा New Land Fragmentation Law 2025

त्यानंतर केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारनं सध्या फक्त आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आयोगाचं नेतृत्व कोण करणार किंवा कोणत्या अटी असतील यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

आठव्या वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यामध्ये 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख पेन्शधारकांना होणार आहे. आठवा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर मूळ वेतनात, भत्त्यांमध्ये आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्ये वाढ होईल.

बँक ऑफ बडोदामध्ये 2500 पदांची भरती! महाराष्ट्रासाठी 485 पदे | Bank Of Baroda Recruitment 2025

महत्त्वाची बाब म्हणजे आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिल्यानंतर फिटमेंट फॅक्टर प्रमाणं पगारात बदल होतील. फिटमेंट फॅक्टरचा वापर सध्याच्या मूळ वेतनाशी गुणाकार करुन नवं मूळ वेतनं काढलं जाईल. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी वेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता.

त्यामुळं मूळ वेतन 7000 हजार रुपयांवरुन 18000 रुपयांपर्यंत वाढलं होतं. संशोधन अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46 असू शकतो. यावरुन आठव्या वेतन आयोगात मूळ वेतन आणि पेन्शन कितीनं वाढणार हे निश्चि होऊ शकतं.

यापूर्वीच्या वेतन आयोगांच्या अंमलबजावणीचा विचार केला असता सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर एकूण पगार आणि भत्त्यांमध्ये जवळपास 54 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात 14.3 टक्के वाढ झाली होती. तर, पहिल्या वर्षी इतर भत्त्यांमध्ये 23 टक्के वाढ झाली होती. आता आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना पगार देताना विविध गोष्टींचा विचार केला जातो. त्यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर लाभांचा समावेश असतो. काही वर्षांपूर्वी मूळ वेतन 65 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत आणलं गेलं आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली. पेन्शन धारकांना केवळ घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता दिला जात नाही.

इंडिया पोस्ट GDS 5वी मेरिट लिस्ट 2025 जाहीर; तुमचे नाव यादीत चेक करा India Post 5th Merit List 2025

Leave a Comment