अतिवृष्टीमुळे राज्यातील “या” शेकडो शाळांना चक्क 01 महिन्याची सुट्टी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर ! School Holiday Announcement

School Holiday Announcement:सध्या राज्यामध्ये काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे , यामुळे सदर भागातील जनजीवन विस्कळीत होत आहेत . अशा स्थितीमध्ये प्रशासनाकडून काही शेकडो शाळांना चक्क एक महिन्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे .

दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये अतिवृष्टी होत असते , यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे . यामुळे शेकडो शाळांना चक्क एक महिन्याची सुट्टी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे .

IMD Weather Update: महाराष्ट्रात पुढील २४ तास धोक्याचे, ११ जिल्ह्यांना हाय अलर्ट

या अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यामधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तब्बल 334 प्राथमिक शाळांना एक महिन्याची म्हणजेच दिनांक 12 ऑगस्टपर्यंत उन्हाळी सुट्टी ऐवजी पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

या भागामध्ये भूस्खलन तसेच अतिवृष्टी कारणामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून दरवर्षी उन्हाळी सुट्टी न देता , पावसाळी सुट्टी दिली जाते . यावर्षीही 01 जुलै ते 12 ऑगस्ट 2025 पर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

बँक ऑफ बडोदामध्ये 2500 पदांची भरती! महाराष्ट्रासाठी 485 पदे | Bank Of Baroda Recruitment 2025

यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील 30 शाळा , महाबळेश्वर तालुक्यातील 118 शाळा , पाटण तालुक्यातील 186 शाळा अशा एकूण 334 प्राथमिक शाळांना पावसाळी सुट्टी 12 ऑगस्ट पर्यंत जाहीर करण्यात आलेली आहे.

तुकडाबंदी कायद्याचा तुकडा अखेर पडला, 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी, कायद्यातील जाचक अटी शिथिल,असा होणार फायदा New Land Fragmentation Law 2025

Leave a Comment