Employee Inter-District Transfer:विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र.६६१५/२०२३
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१, दि.२१.६.२०२३
२) शासन पत्र क्र. आजीब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.२३.८.२०२३.
३) शासन पत्र क्र. आजिब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.३१.८.२०२३, दि.१३.९.२०२३, दि.६.१०.२०२३, दि.२७.१०.२०२३, दि.२२.११.२०२३, दि.३०.११.२०२३ दि.१८.१२.२०२३.
४) मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र. ६६१५/२०२३
५) शासन पत्र बैठक-१४२५/प्र.क्र.७२/आस्था-१४, दि.२८.३.२०२५.
महोदय,
शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.२१.६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सन २०२२ च्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधिन ठेऊन जशी पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्राम विकास विभागाने करावी. त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णतः बंद करण्याची तरतुद ग्राम विकास विभागाने त्यांच्या बदली धोरणात करावी, असे नमुद करण्यात आले होते.
२. उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सन २०२२ व्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेऊन जशी पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबत बार भी ज्याबाबतच्या सूचना संदर्भ क्र. २ येथील शासन पत्र दि. २३.८.२०२३ अन्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारा जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या होत्या.
३. तद्नंतर, आंतरजिल्हा ०२२ च्या बदली प्रक्रियेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बातची कार्यवाही शासनाच्या संदर्भ क्र. ३ येथील दि.३१.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सुरु करण्यात आलेली होती. तसेच तद्नंतर सन २०२३ करीता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली आहे.
या बाबत सर्व जिल्हा परिषदांना वेळोवेळी संदर्भ क्र. ३ येथे नमुद पत्रांन्वये सूचित करण्यात आले होते. सद्यःस्थितीत पवित्र पोर्टलव्दारे नवीन शिक्षकांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२५ करीता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
४. या विभागाच्या दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीव्दारे राबविण्यात येते. त्यानुसार या विभागाच्या दि.२८.२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५ करीता आंतरजिल्हा बदली बाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच सन २०२२ च्या प्रतिक्षाधिन शिक्षकांकरीता व सन २०२३ च्या पात्र शिक्षकांकरीता संदर्भ क्र. ३ येथे नमुद पत्रांन्वये सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
तथापि, संदर्भ क्र. २ येथील दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने राबवावी, याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याचे आढळून येते. ही वस्तुस्थिती विचारात घेता, या विभागाकडून संदर्भ क्र. २ येथील दि.२३.८.२०२३ रोजी निर्गमित केलेले पत्र रद्द करण्यात येत आहे.