Raj Thackeray and Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षांची चांगलीच पिछेहाट झाली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 20 जागा मिळाल्या, तर राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. तीन वर्षांपूर्वीच्या बंडाचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत बसला. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उद्या 5 जुलै रोजी दोघेही वरळीतील कार्यक्रमात एकत्रितपणे उपस्थित राहणार आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं ही इच्छा होती. मात्र ती इच्छा त्यांना हयातीत पूर्ण करता आली नाही. दोघं कधीच राजकीयदृष्ट्या एकत्र आले नाहीत. परंतु महायुती सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीबाबत काढलेल्या निर्णयामुळे (जीआर) हे शक्य झालं. या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली.
जनतेतही मोठा असंतोष उसळला. सरकारला शेवटी दोन्ही हिंदी जीआर मागे घ्यावे लागले. सरकारला नमवण्यात यश आल्याने आता ठाकरे बंधू एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्या युतीची शक्यता चर्चेत आली आहे.
राज आणि उद्धव एकत्र आले, तर मुंबईतील राजकीय चित्र कसं असेल, यावर सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आणि निवडणूक रणनीतीकार अमिताभ तिवारी यांनी एक महत्त्वपूर्ण आकडेवारी सादर केली आहे.
2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्या वेळी शिवसेना एकसंध होती आणि भाजपसोबतची युती तुटलेली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेनं 84, भाजपनं 82, काँग्रेसनं 31, मनसेनं 7, राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 आणि इतर पक्षांनी 14 जागा जिंकल्या होत्या.
मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे
शिवसेना: 28.3 टक्के
भाजप: 27.5 टक्के
काँग्रेस: 16.2 टक्के
मनसे: 7.7 टक्के
अमिताभ तिवारी यांच्या मते, जर 2017 सालच्या निवडणुकीत उद्धव आणि राज एकत्र आले असते, तर त्यांना एकत्रितपणे 118 जागा मिळाल्या असत्या. या मतविभाजनाचा सर्वात मोठा फायदा भाजप आणि काँग्रेसला झाला. युती झाली असती, तर भाजपला फक्त 64 आणि काँग्रेसला 25 जागा मिळाल्या असत्या.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमच्या पत्नीसोबत खाते उघडा, दरमहा ९ हजार रुपये कमवा Post Office Scheme
मुंबईकरांचा ठाकरेंना नेहमीच पाठिंबा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यभरात 10 टक्क्यांहून कमी मते मिळाली आणि केवळ 20 जागा जिंकता आल्या. मात्र, मुंबईत त्यांनी चांगली कामगिरी केली. 23.2 टक्के मतांसह त्यांनी 10 जागांवर विजय मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यभरात चांगली कामगिरी केली असली, तरी मुंबईत त्यांना 17.7 टक्के मतांसह फक्त 6 जागा मिळवता आल्या.
राज्यात 1.6 टक्के मते मिळवणाऱ्या मनसेला मुंबईत मात्र 7.1 टक्के मते मिळाली आहे. शिवसेना आणि मुंबई, ठाकरे आणि मुंबई यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलं आहे. मुंबईकरांनी ठाकरेंना नेहमीच पाठिंबा दिला आहे. 2017 मध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी 36 टक्के इतकी होती, तर भाजपची 27.5 टक्के होती.
लाडक्या बहिणींना मिळतंय 55,000 रुपये कर्ज, फक्त हे काम करा.Ladki Bahin Loans
राज आणि उद्धव एकत्र निवडणूक लढले तर…
2024 च्या निवडणुकीत मुंबईत भाजपला 29.2 टक्के, शिंदेसेनेला 17.7 टक्के, ठाकरेसेनेला 23.2 टक्के आणि मनसेला 7.1 टक्के मते मिळाली. म्हणजेच उद्धव आणि राज यांनी जर युती केली, तर त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 30 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. विशेषतः शिंदे गटाची मुंबईतील ताकद कमी असल्याचं यामुळे अधोरेखित होतं. शिवाय हिंदी भाषासक्तीचा जीआर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याकडून निघाल्यामुळे मराठी मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो.
हिंदी भाषासक्तीचा मुद्दा तापण्यापूर्वी “वोट वाईब” या एजन्सीनं घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, 52 टक्के मुंबईकरांनी सांगितलं होतं की, उद्धव आणि राज यांची युती झाली, तर ते त्यांना पाठिंबा देतील. केवळ 26 टक्के लोकांनी शिंदे गटाच्या बाजूने मत दिलं होतं. त्यामुळे जर राज आणि उद्धव एकत्र निवडणूक लढले, तर त्याचा निश्चितच दोघांनाही फायदा होऊ शकतो.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा