50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन ; GR निर्गमित दि.01.07.2025 | State Employees Retirement Update

State Employees Retirement Update:विभागीय पुनर्विलोकन समिती स्थापन करणेबाबत.महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम १० (४) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी/कर्मचारी यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर, यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा, सेवेत राहण्याची पात्रापात्रता (पात्र/अपात्र) आजमाविण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करुन सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेत पुढे चालू ठेवावे व अकार्यक्षम, तसेच संशयास्पद सचोटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करावे, असे शासनाचे धोरण आहे.

२. पुनर्विलोकन धोरणानुसार, मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना वयाच्या ५०/५५ वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षाची सेवा झाल्यावर, त्यांची सेवेत राहण्याची पात्रापात्रता (पात्र/अपात्र) आजमाविण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करुन शिफारस करण्यासाठी / नियमानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यासाठी संदर्भाधीन क्र.२ दि.०९/०८/२०२४ च्या शासन निर्णयान्वये विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यांत आली आहे. सदर समिती मध्ये अंशतः बदल करुन पुढीलप्रमाणे समिती पुनर्गठीत करण्यास मान्यता देण्यांत येत आहे.

(१) मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील गट-अ (राजपत्रित) (अतिकालिक वरिष्ठ श्रेणी) ग्रेड वेतन १०००० व त्यावरील, गट-अ (राजपत्रित) (वरिष्ठ वेतन श्रेणी) ग्रेड वेतन ७६०० व त्यापेक्षा अधिक परंतू १०००० पेक्षा कमी, गट-अ (राजपत्रित) (कनिष्ठ वेतन श्रेणी) ग्रेड वेतन ७६०० पेक्षा कमी व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांकरिता विभागीय पुनर्विलोकन समिती खालीलप्रमाणे असेल :-

SBI बँकेत 50 हजार पगाराची नोकरी, तात्काळ अर्ज करा SBI Bank Recruitment 2025

१ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (मृद व जलसंधारण)

अध्यक्ष

२ सह/ उप सचिव (आस्थापना) (मृद व जलसंधारण) सदस्य

३ सह/ उप सचिव (मृद व जलसंधारण)सदस्य

४ अवर सचिव/ कक्ष अधिकारी (जल-५) (मृद व जलसंधारण) सदस्य सचिव

विभागीय पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील जे राजपत्रित अधिकारी शासन सेवेत ठेवण्यास पात्र ठरतील अशा गट-अ अधिकाऱ्यांबाबतच्या शिफारशी अंतिम निर्णयासाठी शासनास सादर करण्यात येतील आणि गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांबाबतच्या शिफारशी अंतिम निर्णयासाठी विभागाच्या मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येतील.

विभागीय पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील जे गट-अ आणि गट-ब चे अधिकारी सेवेत चालू राहण्यास निर्विवादपणे अपात्र ठरणार असतील अशा अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुध्दच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दि.०१/०३/२०१७ नुसार गठीत करण्यात आलेले आस्थापना मंडळ क्र.२ हे अभिवेदन समिती असेल.

(२) मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांकरिता विभागीय पुनर्विलोकन समिती खालीलप्रमाणे असेल :-

१ सह/ उप सचिव (आस्थापना) (मृद व जलसंधारण)अध्यक्ष

२ सह/ उप सचिव (मृद व जलसंधारण)सदस्य

३ अवर सचिव (जल-१७) (मृद व जलसंधारण)सदस्य

४ अवर सचिव/कक्ष अधिकारी (जल-५) (मृद व जलसंधारण) सदस्य सचिव

वरील विभागीय पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील जे गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड चे अधिकारी / कर्मचारी पात्र/अपात्र असतील अशा अधिकारी/ कर्मचाऱ्यांबाबतच्या शिफारशी अंतिम निर्णयासाठी विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (मृद व जलसंधारण) यांच्याकडे सादर करण्यात येतील.

राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025 | State Employees shasan nirnay Update

पुनर्विलोकनानंतर मृद व जलसंधारण विभाग (मंत्रालय खुद्द) मधील जे गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड चे अधिकारी / कर्मचारी अपात्र असतील, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांबाबतच्या मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुध्दच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता खालीलप्रमाणे विभागीय अभिवेदन समिती गठीत करण्यात येत आहे :-

१ अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (मृद व जलसंधारण) अध्यक्ष

२ सह/ उप सचिव (मृद व जलसंधारण)सदस्य

३ सह/ उप सचिव (आस्थापना) (मृद व जलसंधारण)सदस्य सचिव

३. पूर्वपृष्ठावरील पुनर्विलोकन समितीचे कामकाज शासनाने पुनर्विलोकनाविषयी विहित केलेल्या निकषांनुसार / कार्यपध्दतीनुसार राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०११७००४१६४२६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

img 20250702 wa00037666219090801871758 img 20250702 wa00044239060320061523694

Leave a Comment