11th Admission 11 वी ऍडमिशन प्रथम मेरिट यादी दि. 30/06/2025 ला घोषित होणार! शासन निर्णय | 11th Admission Merit List 2025

11th Admission Merit List 2025:शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.

यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. वेळापत्रकाप्रमाणे दिनांक २६ जून २०२५ ला विद्यार्थ्यांना व शाळा महाविद्यालयांना पहिल्या फेरीतील प्रवेश यादी जाहीर करणे निश्चित करण्यात आले होते.

परंतू शासन शुध्दीपत्रक क्रमांक प्रवेश १२२५/प्र.क्र.-१६/एसडी-२ दिनांक २३ जून २०२५ रोजीला अन्वये मा. न्यायालय निर्णयाप्रमाणे इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालय मधील एकूण प्रवेश क्षमतेमधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे

असे असताना काही मा. न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे प्रवेश प्रक्रियेमधील दिनांक २६ जून २०२५ ला जाहीर करण्यात येणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न उच्च माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रवेश याद्या जाहीर करता येणार नाहीत.

संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.

IMG 20250627 012657

उपरोक्त बदलाची इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ठ असणाऱ्या सर्व कनिष्ठ महाविद्यलायांचे प्राचार्य, विद्यार्थी / पालक यांनी नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.

अधिकृत – https://mahafyjcadmissions.in

ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in

हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४.

IMG 20250626 WA2042

Leave a Comment