Maharashtra Teacher Transfer Update:शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन २०२५
संदर्भ:
– १. जिल्हा परिषद, नांदेड पत्र क्र. जिपनां/शिअप्रा/प्रा-०१ ब/३८८६/२०२५, दि.१८.०६.२०२५.
२. जिल्हा परिषद, कोल्हापूर पत्र क्र. कोजिप/शिक्षण/प्राथ/वशि-१९/१९५७११३/२०२५. दि.१७.०६.२०२५.
३. राज्यपत्र क्र. न्यायप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४, दि.०७.११.२०२४.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्रास अनुसरून कळविण्यात येते की, या विभागाच्या दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात. संगणकीय प्रणालीद्वारे बदल्यांकरिताची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मे. विन्सीस आय.टी.सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबींसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यावर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
२. तसेच दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र.२.४.४ नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ठ शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरूस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल, बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरूस्ती करण्यात येणार नाही, अशी तरतुद आहे. ही तरतुद शासनाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.०७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत बदलीकरिता घोषित केलेल्या वेळापत्रकामधील सूचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात आलेली आहे.
तथापि, बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, छ. संभाजीनगर, धुळे, जळगांव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या यादयांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती.
३. तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नांदेड यांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून देखील दुरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे. तसेच विविध लोकप्रतिनिधींमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.
दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा होणार,नव्या नियमांना मंजुरी | CBSE 10th Board Exam New Rules
४. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यांनुसार राबविण्यात येते. त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याकरिता वेळापत्रकानुसार सुमारे पाच महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे, बदलीस होकार/नकार दर्शविणे, बदलीकरिता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे. तसेच ही कार्यवाही याकरिता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे. वैयक्तिक अडचणींकरिता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही. त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्दयांबाबत येणाऱ्या अडचणींबाबत सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत मे. विन्सीस आय. टी. सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांच्याशी संपर्क करून विहित मुदतीत समन्वयाने तपासून सोडविणे आवश्यक आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
५. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणांस विनंती आहे.