राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे न करणेबाबत! महत्त्वाचे शासन परिपत्रक | Important government circular regarding not celebrating personal functions in government offices

Important government circular regarding not celebrating personal functions in government offices:विभागाचे अधिकारी वा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ (उदा. वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जावून कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत, नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठत्त राहावे लागते, अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणेची बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार उचित नाही.

त्यामुळे याद्वारे निर्देश देण्यात येतात की, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे कार्यालय तसेच अधिनस्त सर्व कार्यालयांत यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणेत येईल.

SBI बँकेमधून 10 लाख रुपये कर्ज घेतल्यास, किती EMI भरावा लागेल पहा सविस्तर सविस्तर.SBI Personal Loan

तसेब यापुर्वी इकडील विभागाचे अधिकारी वा कर्मचारी यांनी वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभकार्यालयात व कार्यालयीन वेळेत साजरे केले असल्याची बाब निदर्शनास आलेस त्या अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचे नियंत्रण अधिकारी यांनी तात्काळ समज द्यावी. कोणत्याही परिस्थितीत अशा अनुचित बाबी यापुढे घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

प्रत उपसबालक भूमि अभिलेख (भूमापन/नागरी भूमापन) सलंग्न जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांना माहितीसाठी.

प्रत- उपसंचालक भूमि अभिलेख पुणे/कोकण/नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती व नागपूर यांना माहिती व कार्यवाहीसाठी.

प्रत स्वीय सहाय्यक, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांना माहितीसाठी

प्रत-स्वीय सहाय्यक, अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे यांना माहितीसाठी,

प्रत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख (सर्व) यांना माहिती व कार्यवाहीसाठी.

प्रत- उप अधीक्षक भूमि अभिलेख व नगर भूमापन अधिकारी (सर्व) यांना माहिती व कार्यवाहीसाठी.

प्रत कार्यालय अधीक्षक, आस्थापना-१,२,३,४. लेखा-१,२.३. भूमापन १,२,३,४,५ नागरी भुमापन-१,२.३. स्वमित्व, एकत्रिकरण, रा.भू.अ.आ.का.- १.२. आय टी-१. २. नक्शा (शहरी नगर भूमापन) यांना माहितीसाठी

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

IMG 20250625 WA0110

Leave a Comment