जि.प. शाळा बंद होणार ? धोरण रद्द करण्याची मागणी अस्वस्थता वाढली: अनेक शाळांतील शिक्षक संख्या कमी होणार Z.P. Schools will be closed

Z.P. Schools will be closed:गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार होत आहे.त्यामुळे अनेक शाळांतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे.

शिक्षण विभागाने संचमान्यतेच्या निकर्षाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्यात येणार आहेत.

नवीन शाळा सुरू करताना, नवे वर्ग सुरू करताना, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करताना ही या संचमान्यतेचा विचार केला जाणार आहे.

राज्यात अपात्र शिधापत्रिका मोहीम सुरू; GR निर्गमित Ration Card Ineligible Govt Decision

या धोरणामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे ती रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. शासनाने संचमान्यतेचे सुधारित धोरण गतवर्षी म्हणजे १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केले होते. यावर्षीपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता.

संचमान्यतेचे नवीन धोरण काय ?

संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार हॅलिडच्या संख्येनुसार केली जाणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षक कमी होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांवर खासगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे संकट का आले ?

गावागावांत खासगी शाळा गावागावात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले, त्यामुळे विद्यार्थी कमी झाले.

विद्यार्थ्यांचे स्थलांतर वाढले पालकांच्या रोजगारासाठी विद्यार्थी शहरांकडे किंवा गाांकडे स्थलांतरित झाल्याने समस्या निर्माण झाली.

विद्यार्थ्यांचा कल अकादमीक डेखासगी अकादमीत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सुरू झाल्यानेही शाळा ओस पडल्या..

तिसरा शिक्षक उपलब्ध होणे मुश्किल

गतवर्षी लागू केलेले धोरण या • मार्चमध्ये अंमलात येईल. लहान शाळांना तिसऱ्या शिक्षक मंजुरीसाठी पटसंख्या ६१ असावी अशी अट होती. नव्या संचमान्यतेमध्ये ही संख्या ७६ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे तिसरा शिक्षक उपलब्ध होणे मुश्किल आहे.

नव्या संचमान्यता धोरणानुसार, 3 एखाद्या शाळेची पटसंख्या २१० पेक्षा जास्त असेल, तर तेथे पुढील प्रत्येक शिक्षकासाठी ३० ऐवजी ४० विद्यार्थी आवश्यक असतील. स्वाभाविकच इतक्या पटसंख्येचे उद्दिष्ट गाठले नाही, तर शिक्षक मिळणार

नव्या संचमान्यता धोरणानुसार 5 पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक यांच्यासह एकूणच शिक्षकसंख्या कमी होणार आहे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांना बदली घेऊन जिल्ह्याबाहेर जावे लागेल.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment