सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर. PM Solar Panel

PM Solar Panel:मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त आणि स्थायी आहे

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच वितरित केला जातो.

तर अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के आहे, बाकीचे केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानरूपात मिळते.

जमिनीच्या आकारानुसार, ३ ते ७.५ अश्वशक्तीच्या पंपांसह पाच वर्षांची दुरुस्ती हमी, विमा, वीजबिलाची समस्या नाही आणि लोडशेडिंगची अडचण नाही. सिंचनासाठी दिवसाच्या वेळेत वीज पुरवठा शक्य झाला आहे.

२.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ३ अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषी पंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन धारकांसाठी ५ अश्वशक्ती आणि ५ एकरांवरील शेतजमीन धारकांसाठी ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देण्याची योजना आहे.

माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन बाबत मोठी अपडेट ; शासन निर्णय (GR) जारी ! State Employees January Salary GR

पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो मान्य केला जाईल. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिरी, बोअरवेल यांचे मालक बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्यांजवळील शेतजमीन धारक शेतकरीदेखील या योजनेसाठी पात्र होतील.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, जसे की बोअरवेल, विहिरी वगैरे, त्याची खात्री महावितरणद्वारे केली जाईल. तथापि, जलसंधारणाच्या कामाच्या पाणी साठ्यामधून पाणी उचलण्यासाठी हे पंप वापरता येणार नाहीत.

‘अटल सौर कृषी पंप योजना-१’, ‘अटल सौर कृषी पंप योजना-२’ आणि ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.

शेतकऱ्यांचे भन्नाट जुगाड, ही 78 रुपयांची वस्तू, गायी आणि म्हशींना अनेक गोष्टीपासून वाचवेल! Agriculture Innovation Desi Jugad

याबाबत महावितरणच्या सूत्रांनी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले; मात्र, अधिकृत पुरवठा का होऊ शकलेला नाही, या प्रश्नावर महावितरणकडून अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच मागेल त्याला एक महिन्यात सौरपंप देणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

३,१३७ शेतकऱ्यांना सौरपंप◼️ महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, बारामती मंडळात ७३०० शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत सौर पंपाची मागणी करीत पैसे भरले आहेत.◼️ त्यापैकी ५,९६८ शेतकऱ्यांनी व्हेंडर देखील निवडले आहेत. त्यापैकी ३,१३७ शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यात आले आहेत, आणि २,३६९ सौर पंप सुरू झाले आहेत.

६० दिवसांच्या मुदतीत सौरपंप बंधनकारक५,९६८ शेतकऱ्यांनी व्हेंडर निवड करून देखील अद्याप २,८३१ शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यात आलेले नाहीत. ६० दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप पुरवठादार कंपनीला स्थापित करणे बंधनकारक आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment