Agriculture Innovation Desi Jugad: अनेकदा गुरे उघड्यावर चरण्यासाठी जातात. जेव्हा ते रस्ता किंवा आजूबाजूच्या परिसरात चरत असतात, अशावेळी चुकून लोखंडी वस्तू गिळण्याच्या घटना समोर येतात. यामुळे जनावरांना असह्य वेदना होतात, वेळेवर उपचार न झाल्यास जनावराचा मृत्यू संभवतो. किंवा सर्पदंशाच्या माध्यमातून देखील जनावरांचा मृत्यू होण्याचे धोके असतात.
दिवसेंदिवस पशुपालकांची संख्या वाढू लागली आहे. दूध उत्पादनासह इतर उत्पन्नाच्या दृष्टीने पशुपालन अतिशय महत्वाचा व्यवसाय होत चालला आहे. मात्र अशा घटनांतून अनेकदा नुकसान सहन करावे लागते. यावरच तामिळनाडू राज्यातील एका शेतकऱ्याने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. पशुपालक सुब्रमण्यम यांनी १५ वर्षांच्या अनुभवाचा वापर करून मॅग्नेटिक बेल कॉलर विकसित केला आहे. विशेष म्हणजे केवळ ७८ रुपयांत ते शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हे मॅग्नेटिक बेल कसं काम करते? यात सुमारे ५०० ग्रॅम वजनाचा एक मजबूत दोरीचा कॉलर आहे, ज्यामध्ये एक दंडगोलाकार चुंबक बसवलेला आहे. हा चुंबक प्राण्याच्या मानेभोवती ठेवला जातो जेणेकरून तो त्याच्या तोंडाजवळ राहील. जेव्हा गाय किंवा बैल जमिनीवर चरतो तेव्हा चुंबक लोखंडी तुकडे, खिळे किंवा तारांना आकर्षित करून घेईल, ज्यामुळे गुरांना लोखंडी वस्तू गिळण्यापासून रोखता येईल.
कीटक आणि सापांपासून संरक्षण सुब्रमण्यम यांचा ‘मॅग्नेटिक बेल कॉलर’ पूर्णपणे स्वदेशी आणि किफायतशीर आहे. दोरी, चुंबक आणि लोखंडी घंटा बाजारात सहज उपलब्ध आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एका कॉलरची किंमत ७८ रुपयांपेक्षा कमी आहे आणि ती सुमारे ३ वर्षे टिकते. त्याला इतर कशाचीही आवश्यकता नाही. घंटीचा उपयोग असाही आहे की, जेव्हा गुरे चालतात, त्यावेळी घंटीचा आवाज होईल, अशावेळी आजूबाजूला असलेले विषारी साप आणि वन्य प्राण्यांना घाबरवतो.
शिवाय, घंटीच्या आवाजामुळे मालक अंधारातही त्यांच्या गुरांना शोधू शकतो. शिवाय, घंटा जवळच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत सावध करते, ज्यामुळे पिकांचे नुकसान टाळता येते.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा