आता घरबसल्या लायसन्स आणि नूतनीकरण.. फक्त ‘आधार’चा मोबाईल जोडावा Driving Licence Update 2026

Driving Licence Update 2026:वाहनचालकांना शिकाऊ परवाना, परवाना नूतनीकरण, आकर्षक क्रमांक किंवा वाहनासंबंधी इतर सुविधांचा लाभ घरबसल्या घेण्यासाठी परिवहन विभागाने ‘आधार कार्ड’ वरील मोबाईल क्रमांक जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जुने मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे.

या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. शिकाऊ परवाना, त्यानंतरचा वाहन चालविण्याचा परवाना, दुबार (डुप्लिकेट) परवाना, परवान्याचे नूतनीकरण आणि अर्जाची स्थिती तपासणे यांसारख्या विविध सुविधांसाठी नागरिकांना स्थानिक ‘आरटीओ’मध्ये जावे लागते.

नवीन विहीर अनुदान करिता हे कागदपत्रे लागणार! तरच मिळणार अनुदान,संपूर्ण कागदपत्रांची यादी पहा! Navin Vihir Yojana Pepar

मात्र, परिवहन विभागाने ‘फेसलेस’ सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी सारथी ४.० ही प्रणाली विकसित केली आहे. मात्र, या सुविधेचा लाभ घेताना अनेक वाहनधारकांच्या नावांमध्ये बदल, मोबाईल क्रमांक बदललेले किंवा सुरू नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असून, आरटीओमध्ये फेऱ्या माराव्याच लागत असल्याचे चित्र आहे.

‘सारथी ४.०’ या ऑनलाईन प्रणालीनुसार वाहन चालविण्याच्या परवाना नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करताच ‘एक वेळ गुप्त क्रमांक’ (ओटीपी) मागितला जातो. मात्र, अनेक वाहनधारकांनी जुन्या काळात वाहन परवाने काढले आहेत. जवळपास ८० टक्क्यांहून अधिक वाहनधारकांच्या परवान्यावरील माहिती आणि मोबाईल क्रमांकामध्ये सांधर्म्य आढळून आले आहे. अनेक वाहनचालकांनी २० वर्षांपूर्वी वाहन परवाने काढले आहेत.

त्यामुळे नूतनीकरण करताना मोबाइल क्रमांकांची नोंद नसल्याने किंवा चालू नसलेला मोबाईल क्रमांक तिथे असल्याने पुढील प्रक्रिया होत नाही. यामुळे आता परिवहन विभागाने ‘आधार कार्ड’वरील माहितीचा आधार घेऊन त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक परिवहन विभागाच्या सेवांसाठी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वाहनधारकांनी मोबाईक क्रमांक आधार कार्डवरील क्रमांकाप्रमाणे अद्ययावत करून घेेण्याबाबत परिपत्रकाद्वारे नमूद केले आहे.

Toll Tax New Rules : आता ‘या’ वाहनांना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अन् ‘एनओसी’ ही मिळणार नाही!Vehicle Fitness Certificate, NOC Regulations

माहिती अद्ययावत कशी कराल?

परिवहन विभागाच्या sarthi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन क्यूआरकोड स्कॅन करावा. त्यानंतर ‘मोबाईल नंबर अपडेट’ हे कळफलक वापरावे. त्यानंतर परवाना क्रमांक आणि जन्मतारीख आदी माहिती भरावी. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकावा. पुढे आधार कार्डला जोडलेला क्रमांक टाकावा. एक वेळ गुप्त क्रमांक (ओटीपी) प्राप्त झाल्यानंतर तो टाकल्यानंतर जुन्या परवान्यावरील क्रमांक अद्ययावत करण्यासाठी विचारले जाईल. त्या प्रमाणे क्रमांक अद्ययावत करावा. शेवटी ‘प्रोसीड’ म्हणून प्रक्रिया पूर्ण करावी.

राज्य सरकार आणि परिवहन विभागाच्या निर्देशानुसार वाहन परवाना नूतनीकरण किंवा इतर सेवांचा लाभ घरबसल्या घेण्यासाठी आधार क्रमांकाला जोडलेला मोबाईल क्रमांक आणि पत्ता किंवा नावातील सांधर्म्य दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल क्रमांक बदलला असल्यास तातडीने दुरुस्ती करावी. – स्वप्नील भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment