PM Kisan Yojana : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या २२ व्या हप्त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा झाले असून, आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर २२ वा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता का?पीएम किसान योजनेच्या नियमानुसार, प्रत्येक हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने दिला जातो. मागील वर्षी १९ व्या हप्त्याचे वितरण २४ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते.
या पॅटर्ननुसार, २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे. अद्याप केंद्र सरकारने तारखेची अधिकृत घोषणा केली नसली तरी, अर्थसंकल्पानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा होऊ शकतात.
बजेट २०२६ मध्ये ६,००० ची मर्यादा वाढणार?यावेळच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या वर्षाला मिळणारी ६,००० रुपयांची रक्कम वाढवून ती ९,००० ते १२,००० रुपये केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, याची अधिकृत पुष्टी १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातूनच होईल.
e-KYC नसेल तर हप्ता अडकणार!ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांचा २२ वा हप्ता अडकू शकतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘e-KYC’ पर्यायावर क्लिक करा.
आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
मिळालेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
(तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिकद्वारे देखील ही प्रक्रिया करू शकता.)
वाचा – होम लोन घेणाऱ्यांची चंगळ! नवीन टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल होणार; पाहा बजेटमधील ५ संभाव्य घोषणा
‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही
पीएम किसान योजनेच्या नियमानुसार, काही अटींचे उल्लंघन करणाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील व्यक्ती घटनात्मक पदावर असल्यास पात्र ठरणार नाही.
भाड्याने शेती करणाऱ्यांना लाभ मिळत नाही, स्वतःच्या नावावर जमीन असणे अनिवार्य आहे.
पती आणि पत्नी दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येत नाही. असे केल्यास सरकारकडून वसुली केली जाऊ शकते.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा