व्हायरल होण्याच्या नादात जीवाशी खेळ, चालत्या ट्रेनमध्ये लटकलेला युवक घसरला अन्….पुढे जे घडलं ते पाहून थक्क Train viral video

Train viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची हवा आज अनेक तरुणांच्या जीवावर बेतताना दिसत आहे. लाईक्स, व्ह्युज आणि फॉलोअर्सच्या नादात काही जण स्वतःचं आयुष्य पणाला लावत आहेत. थोडंसं वेगळं केलं तर व्हायरल होऊ या विचारातून सुरू झालेलं धाडस कधी जीवघेणं ठरेल याचा अंदाजही घेत नाही. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे, तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका चालत्या ट्रेनमधील धोकादायक स्टंटचा आहे. एका तरुणाने ट्रेन वेगात असतानाच दरवाजातून बाहेर लटकून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात शूट झाला असून, काही सेकंदांतच हा स्टंट भयानक अपघातात बदलतो. व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की, ट्रेन भरधाव वेगाने धावत आहे. अशा परिस्थितीत तो युवक ट्रेनच्या दरवाज्यातून बाहेर लटकलेला आहे.

महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अखेर तारीख आली समोर,राजकीय हालचालींना मोठा वेग Maharashtra Panchayat Raj Election Date

एका हाताने तो दरवाज्याला पकडून ठेवतो तर दुसऱ्या हाताने तो स्वतःचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सुरुवातीला तो आत्मविश्वासात असल्यासारखा वाटतो. जणू हा स्टंट त्याच्यासाठी अगदी सोपा आहे. पण, क्षणात सगळं बदलतं. ट्रेनच्या वेगामुळे किंवा तोल बिघडल्यामुळे त्याचा हात सटकतो आणि पाहता पाहता तो युवक चालत्या ट्रेनमधून खाली पडतो.

पाहा व्हिडीओ

खाली पडतानाचा तो क्षण इतका भीषण आहे की, व्हिडीओ पाहणारे थक्क होतील. व्हिडीओत पुढील स्थिती स्पष्टपणे दिसत नाही. हा व्हिडीओ prohibitedvideoz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भीषण अपघात असतानाही अनेकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी या तरुणाच्या कृत्याला मूर्खपणा म्हटलं आहे. “व्हायरल होण्यासाठी जीवाची किंमत मोजावी लागते का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. काही युजर्सनी अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे, तर काहींनी चिंता व्यक्त करत सांगितलं की, असे व्हिडीओ पाहून इतर तरुणही त्याच धोकादायक स्टंटची नक्कल करू शकतात.

मोठी बातमी ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना 69 जागांवर आमने-सामने, 97 ठिकाणी भाजप-ठाकरे भिडणार! संपूर्ण यादी पहा. BMC Election Update

Leave a Comment