मोठी बातमी या शेतकऱ्यांना मिळणार नाही नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ; पाहा शेतकरी कर्जमाफीचे नवे निकष व अटी.Farmer Loan Waiver New Rule 2026
Farmer Loan Waiver New Rule 2026:शेती नुकसानीची होत असल्याने आणि मागील वर्षाच्या पावसाळ्यात महापुराने शेती उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या पिचला गेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी सातत्याने होत आहे.
राज्य शासनाने योग्य वेळी कृषी कर्जमाफी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने शासनाची पावले पडू लागकी आहेत. परंतु या कर्जमाफीचा काही शेतकऱ्यांना लाभ होणार नाही असे दिसत आहे. काय आहे ही नेमकी परिस्थिती, काय आहेत शेतकरी कर्जमाफीचे निकष?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून माहिती मागविली आहे. ३० जून २०२५ अखेरच्या थकबाकीची माहिती आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची माहिती, अशा दोन प्रकारात ही माहिती मागितलेली आहे.
त्यामुळे ही कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजेच ३० जून २०२६ रोजी थकबाकीत जाणाऱ्या थकबाकीदारांसाठी नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा कलही दिसत आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने सहकारी संस्थांचे अप्पर आयुक्त व विशेष निबंधक नागनाथ यगलेवाड यांनी मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यातील माहिती देण्यासंदर्भात पत्र पाठवलेले आहे. या पत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची ही माहिती महाआयटी कडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर त्या पोर्टलवर भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
राज्याचे माजी मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार कर्जमाफी अभ्यास समिती नेमली. या समितीचे काम गेल्या दोन-तीन महिन्यापासून सुरू झाले आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आली आहे.
कर्जदार सभासद माहितीच्या एकत्रीकरणासाठी मार्गदर्शक परिशिष्ट-अ आणि मार्गदर्शक परिशिष्ट- ब अशा दोन विभागात ही माहिती मागविलेली आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती
परिशिष्ट- अ मध्ये ३० जून २०२५ रोजी बँकांकडे असलेल्या सर्व प्रकारच्या थकबाकीची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये अल्पमुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत, पुनर्गठीत/ रूपांतरीत अशा सर्व थकीत कर्जाची माहिती द्यावयाची आहे.
नियमित परतफेडीची माहिती
परिशिष्ट- ब मध्ये नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदार सभासदांची माहिती मागितलेली आहे. यामध्ये आर्थिक वर्ष हे दि. एक एप्रिल ते दि. ३१ मार्चअखेर धरून सन २०२०-२१, सन २०२१-२२, सन २०२२-२३, सन २०२३-२४ आणि सन २०२४-२५ या पाच आर्थिक वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतकऱ्यांची माहिती मागितलेली आहे. यामध्ये पीक कर्जवाटप व वसुलीची माहिती द्यावयाची आहे. या पाच आर्थिक वर्षांमध्ये जरी शेतकरी थकबाकीत गेला असेल तर त्या सालातील कर्ज वितरणाची माहिती नमूद करून थकवसूल ज्या तारखेस आला आहे, ती तारीख नमूद करून ही माहिती संस्थानी द्यावयाची आहे. दरम्यान; तो आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नियमित असणे आवश्यक आहे.
आत्महत्येची वेळच येऊ नये
या समितीने सबंध महाराष्ट्रातील शेतकरी जीवनाचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम आणि बदल घडविणारा दीर्घकालीन उपाय योजनांचा अहवाल करावा, अशा शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. हा अभ्यास अहवाल अशा पद्धतीने तयार करावा की, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये, अशा भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा