Police Bharti Ground Test 2025-26:सन 2024-2025 ची पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. समित्या स्थापन करणेबाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, सन 2024-25 पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 94 व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 03 रिक्त पदांकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दिनांक 01.11.2025 ते 07.12.2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यात आलेले आहेत.
सन 2024-25 ची पोलीस भरती प्रक्रीया राबविण्याकरीता मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाकडून दिनांक 23/12/2025 रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली आहे.
सदर बैठकीमध्ये दिनांक 20/01/2026 रोजीपासुन पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रीया पोलीस मुख्यालय, अलिबाग, ता. अलिबाग, जि.रायगड परेड मैदान याठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
सर्व भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरीता सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे समित्या स्थापन करुन कामाचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक समीतीचे समिती प्रमुख यांनी त्यांचे समीतीतील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांचेशी वेळोवेळी संपर्कात राहुन पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातुन दिलेले कामकाज विहित मुदतीत न चुकता पुर्ण करावे व तसा पुर्तता अहवाल वेळीच सादर करावा.