Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026 मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Election 2026) मनसेकडून नेमके उमेदवार किती याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मनसे 52 जागांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना अर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवण्यात येणार आहे. आजही काही जणांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार तर इच्छुकांची मनधरणी केली जाणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) मुंबई महानगपालिकेची निवडणुक लढवणार आहे. मुंबई महानगरपालिकेत 227 साठी मतदान होणार आहे. यामध्ये मनसेला 52 जागा निश्चित झाल्या आहेत. तर आतापर्यत 135 एबी फॉर्म ठाकरे शिवसेना गटाने दिले आहेत. अजूनही एबी फॉर्म दिले जात आहेत. ठाकरे शिवसेना 160 ते 165 एबी फॉर्म देणार असल्याचा कळतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी 10 ते 12 जागा सोडणार आहे. दरम्यान, मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी ठाकरे बंधूंनी कोणाकोणाला संधी दिली, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळाली, याची संपूर्ण यादी समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. (BMC Election 2026)
333 रुपयांची भन्नाट गुंतवणूक योजना, शंभर टक्के 1700000 रुपये मिळणार! Post Office Scheme
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी- (MNS Candidate List BMC Election 2026)
1. वार्ड क्र. ८ – कस्तुरी रोहेकर2. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील3. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने4. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे5. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी6. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा7. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर8. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके9. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे10. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव11. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी12. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई13. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख14. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी15. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते16. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे17. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी18. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ19. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज20. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते21. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव22. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली23. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे24. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे25. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे26. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके27. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार28. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी29. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी30. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन31. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर32. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव33. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर34. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक35. वार्ड क्र. ३६ – प्रशांत महाडिक36. वार्ड क्र. २१६ – राजश्री नागरे37. वार्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी
नावं येतील, तशी यादी अपडेट होईल…
ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी- (Shivsena UBT Candidate List BMC Election 2026)
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर६) प्रभाग क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर७) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले८) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे९) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील१०) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर११) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर१२) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे१३) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील१४) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर१५) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव१६) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार१७) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू१८) प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया१९) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे२०) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे२१) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने२२) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत২৩) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी२४) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर२५) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान२६) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे२७) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत२८) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर२९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत३०) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे३१) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री३२) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर३३) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे३४) प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे३५) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत३६) प्रभाग क्रमांक ११४ – राजोल पाटील३७) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर३८) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव३९) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे४०) प्रभाग क्रमांक १२२ – निलेश साळुंखे४१) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे४२) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख४३) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार४४) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले४५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील४६) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे४७) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते४८) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू४९) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे५०) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर५१) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे५२) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे५३) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे५४) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले५५) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे५६) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर५७) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर५८) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले५९) प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के६०) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे६१) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे६२) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके६३) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे६४) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड६५) प्रभाग क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे६६) प्रभाग क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर६७) प्रभाग क्रमांक १८० – अस्मिता गावकर६८) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य६९) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे७०) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश७१) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी७२) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे७३) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील७४) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत७५) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे७६) प्रभाग क्रमांक १९५ – विजय भणगे७७) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर७८) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये७९) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर८०) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ८१) प्रभाग क्रमांक २०१ – रेखा कांबळे८२) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ८३) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे८४) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर८५) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे८६) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ८७) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर८८) प्रभाग क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड८९) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर९०) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर९१) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक९२) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
नावं येतील, तशी यादी अपडेट होईल…
मुंबईत 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार?
राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता ‘ठाकरे बंधू विरुद्ध महायुती’ असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. (BMC Election 2026)