Old Pension Scheme Employee News:केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आले आहे . सदर समितीला कामकाजाची रुपरेषा देखिल देण्यात आलेली आहे.
यानुसार पेन्शन धारकांना आता आठवा वेतनातुन वगळण्यात आले आहेत . यांमध्ये केवळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील केंद्रीय कर्मचाऱ्यांचाच विचार करण्यात आला आहे.
पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन वाढीवर कोणताही विचार नसणार आहे . ज्यामुळे तब्बल 59 लाख पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगापासुन वंचित रहावे लागणार आहेत .
प्रत्येक वेतन आयोगामध्ये पेन्शन धारकांना देखिल समावेश करण्यात येत असते , परंतु यंदाच्या आठवा वेतन आयोगांमध्ये केंद्र सरकारच्या नविन वित्तीय धोरण 2025 जाहीर झाल्याने पेन्शन धारकांना वगळण्यात आले आहे .
अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना (शेअर मार्केट आधारावर) लागु करण्यात आलेली आहे . ज्यांमध्ये जुनी पेन्शन सारखे आर्थिक व सामाजिक लाभ मिळत नाही .
आता नविन वेतन आयोगातुन वगळल्याने पेन्शन धारकांना वाढीव आर्थिक लाभापासुन वंचित रहावे लागणार आहे . यावर पेन्शन धारक संघटना मार्फत नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे .