State Employees New Pay Scale:दिनांक २८.४.२०२२ रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत.
वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत एस-२७ : ११८५००-२१४१०० या ऐवजी १२३१००-२१५९०० अशी सुधारणा करण्यात आली आहे.
तसेच संदर्भ क्र.२ येथील दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ (खुल्लर समिती) च्या शिफारशीनुसार ७१ संवर्गाच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
वित्त विभागाच्या दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजीच्या अधिसूचनेन्वये व दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणी मध्ये वेतननिश्चिती करताना पूर्वीच्या असुधारित वेतनश्रेणीमधील वेतनापेक्षा कमी टप्प्यावर वेतन निश्चित होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने आता पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
शासन परिपत्रक :-
वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ (खुल्लर समिती) ने केलेल्या शिफारशीनुसार दिनांक १३.२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना ज्या अधिकारी/कर्मचाऱ्याचे पूर्वीच्या असुधारित वेतनश्रेणीतील वेतनापेक्षा सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांची त्या वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतननिश्चिती करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
त्याच धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक २ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती करताना ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनश्रेणी लागू करुन वेतननिश्चिती करतेवेळी जर वेतन पूर्वी पेक्षा कमी होत असेल तर अश्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करावे.
सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करुन, तद्नंतरच वेतननिश्चिती अंतिम करुन पुढील कार्यवाही करण्यात यावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२५१२१९१६४४०९९४०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.मुग्धा नितीन
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा