जीवघेणा अपघात टळला! लिफ्ट शाफ्टमध्ये लहान मुल कोसळणार इतक्यात… सिक्युरिटी गार्डनं धावत येऊन वाचवलं Lift Viral Video

Lift Viral Video:लहान मुलं कितीही गोंडस वाटत असली तरी त्यांना डोळ्यात तेल घालून जपावं लागते. नजर हटेपर्यंत लहान मुलं काही नाही काही करामती करतात. पालकांचे चुकून दुर्लक्ष झाल्याने अनेकदा लहान मुल अपघातांना बळी पडतात.

असाच एका थरारक अपघाता व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये सहज चालत असलेलं एक छोटं लेकरू… पुढे उघडं लिफ्टचं दार… आत लिफ्ट नाही. एक पाऊल पुढे टाकले असते तर काही कळण्याआधी जीवघेणा अपघात घडू शकला असता. पण याच क्षणी तिथे बसलेला सुरक्षा रक्षक धावत आला अन् मोठा अनर्थ टळला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की छोटा मुलगा लॉबीमध्ये चालत पुढे जात आहे. समोरचं लिफ्टचं दार उघडं आहे, पण आत लिफ्ट नाही. काही पावले पुढे पडली असती तर घटना थरकाप उडवणारी ठरली असती.

जवळच बसलेला सिक्युरिटी गार्ड आधी सहजपणे बघतो; परंतु क्षणात त्याला परिस्थितीची गांभीर्य लक्षात येते. तो एका उडीत उठतो, धावत जातो आणि शेवटच्या क्षणी लेकराला उचलून सुरक्षित बाजूला घेतो. व्हिडिओ इथेच संपतो… पण स्क्रीनवर संपणारी दृश्यं, अनेकांची श्वास रोखून धरणारी असतात.

सोशल मीडियावर कौतुकाची बरसात (Praised Widely On Social Media)

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सिक्युरिटी गार्डच्या सतर्कतेचं, धाडसाचं, तत्परतेचं प्रचंड कौतुक होत आहे. “Give this man a raise” अशी मागणी करणारे कमेंट्स, “अशा क्षणी उपस्थित बुद्धी दाखवणं ही खरी हिरोगिरी” असं म्हणणारे संदेश आणि “कधीही न विसरता येणारी देवासारखी धाव” अशा प्रतिक्रिया सातत्याने उमटत आहेत. अनेकांनी तर पालकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत “मुलं आसपास असताना इतकी निष्काळजी कशी काय?” असा सवाल केला आहे.

Leave a Comment